Aurangabad Graduate Constituency Election: भाजपला धक्का, औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणुकीत राष्ट्रवादीचे डॅमेज कंट्रोल
Maharashtra Legislature | (Archived images)

Maharashtra MLC Election 2020: औरंगाबाद पदवीधर मतदारसघात (Aurangabad Graduate Constituency Election) भाजपला चांगलाच धक्का बसला आहे. भाजप (BJP) बंडखोर उमेवदवार, माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी आपला निवडणूक अर्ज केवळ मागेच घेतला नाही, तर भाजपलाही सोडचिठ्ठी दिली आहे. दुसऱ्या बाजूला भाजप नेत्या पंकजा मुंडे समर्थक रमेश पोकळे यांनी आपला निवडणूक अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळे सहाजिकच भाजप मतांचे विभाजन होणार हे निश्चित आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बंडखोर उमेदवार ईश्वर मुंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद या मतदारसंघात वाढल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात 35 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

जयसिंगराव गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, भारतीय जनता पक्षात मी ज्येष्ठ नेता होतो. आता भाजपच्या राज्याच्या टीममध्ये कोणाच्यात हिंमत नाही मला समजून सांगण्याची. पण, दीड दिवसात कोल्हे ऊसात असा हा सगळा प्रकार आहे. त्यामुळे मी भाजपा सोडत आहे. भाजपला मला जोरात आपटायचे आहे. ते खूप वर गेलेत. 50,60 हजार फुटांच्याही भाजप वर गेला आहे. त्यांना जमीनीवर आणण्यासाठी मला काम करायचा आहे. भाजपमध्ये वाव मिळत नसल्यानेच आपण पक्ष सोडण्याचा विचार केल्याचे जयसिंगराव गायकवाड यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Jaysingrao Gaikwad Quits BJP: मराठवाड्यात भाजपला मोठा धक्का; माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांची पक्षाला सोडचिठ्ठी)

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघातील उमेदवार

1) बोराळकर शिरीष (पक्ष : भारतीय जनता पार्टी) औरंगाबाद

2) सतीश भानुदासराव चव्हाण (पक्ष: नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी) औरंगाबाद

3) अब्दुल रऊफ (पक्ष : समाजवादी पार्टी) औरंगाबाद

4) अंकुशराव शिवाजीराव पाटील (पक्ष : राष्ट्रीय मराठा पार्टी) लातूर

5) कुणाल गौतम खरात (पक्ष : ऑल इंडिया मजलिस ए इस्तेहादुल मुस्लमीन (AIMIM) औरंगाबाद

6) ढवळे सचिन राजाराम (पक्ष : प्रहार जनशक्ती पक्ष) औरंगाबाद

7) प्रा.नागोराव काशीनाथ पांचाळ (पक्ष : वंचित बहुजन आघाडी) परभणी

8) डॉ.रोहित शिवराम बोरकर (पक्ष : आम आदमी पार्टी) पुणे

9) शे.सलीम शे.इब्राहिम (पक्ष : वंचित समाज इन्साफ पार्टी) परभणी

10) सचिन अशोक निकम (पक्ष : रिपब्लिकन सेना) औरंगाबाद

11) अशोक विठ्ठल सोनवणे (पक्ष : अपक्ष ) औरंगाबाद

12) ॲड./प्रा. अश्विनकुमार पुरभाजी क्षीरसागर पाटील, कोळीकर उर्फ ' के.सागर ' (पक्ष : अपक्ष ) नांदेड

13) आशिष आशोक देशमुख (पक्ष : अपक्ष) बीड

14) उत्तम बाबुराव बनसोडे (पक्ष : अपक्ष) नांदेड

15) काजी तसलीम निजामोद्दीन (पक्ष : अपक्ष) उस्मानाबाद

16) कृष्णा दादाराव डोईफोडे (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद

17) ॲड.गणेश नवनाथ करांडे (पक्ष : अपक्ष) बीड

18) घाडगे राणी रवींद्र (पक्ष : अपक्ष) बीड

19) दिलीप हरिभाऊ घुगे (पक्ष : अपक्ष), हिंगोली

20) पोकळे रमेश शिवदास (पक्ष : अपक्ष) बीड

21) भारत आसाराम फुलारे (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद

22) ॲड. (डॉ.) यशवंत रामभाऊ कसबे (पक्ष : अपक्ष) परभणी

23) रमेश साहेबराव कदम (पक्ष : अपक्ष) नांदेड

24) राम गंगाराम आत्राम (पक्ष : अपक्ष) लातूर

25) वसंत संभाजी भालेराव (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद

26) विलास बन्सीधर तांगडे (पक्ष : अपक्ष) जालना

27) डॉ.विलास गोवर्धन जगदाळे (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद

28) विशाल उध्दव नांदरकर (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद

29) ॲड.शरद बहिणाजी कांबळे (पक्ष : अपक्ष) बीड

30) ॲड.शहादेव जानू भंडारे (पक्ष : अपक्ष) बीड

31) ॲड.शिरिष मिलिंद कांबळे (पक्ष : अपक्ष) बीड

32) शेख हाज्जू हुसेन पटेल (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद

33) समदानी चॉदसाब शेख (पक्ष : अपक्ष) नांदेड

34) सिध्देश्वर आत्माराम मुंडे (पक्ष : अपक्ष) बीड

35) संजय तायडे (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद.

दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार ईश्वर मुंडे यांनी आपला निवडणूक अर्ज मागे घेतला आहे. आपल्या मागे पदवीधरांची मते मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे महाविकासआघाडीने आपल्याला उमेदवारी द्यावी अशी आपली मागणी होती. परंतू, मला उमेदवारी मिळाली नाही. तरीही महाविकासआघाडीच्या उमेदवारांमध्ये मतांची विभागणी होऊ नये यासाठी आपण आपली उमेदवारी मागे घेत असल्याचे ईश्वर मुंडे यांनी म्हटले आहे.