MHADA | Photo Credits: File Photo

7th Pay Commission Updates:  2016 साली केंद्र सरकारने सातवे वेतन आयोग (7th Pay Commission) लागू केले. त्यानंतर देशातील राज्य सरकार आणि इतर सरकारी कर्मचार्‍यांनाही तो लागू करण्यात आला आहे. आता म्हाराष्ट्रात म्हाडा अधिकारी, कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोगानुसार पगार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. म्हाडाच्या राज्यातील अधिकारी कर्मचार्‍यांना नोव्हेंबर महिन्याच्या पगारात वाढीव रक्कम मिळणार आहे. ही वाढ सुमारे 15% असेल असा अंदाज बांधण्यात आला आहे. 7th Pay Commission: पुणे महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांना 7वे वेतन आयोग लागू होईपर्यंत मिळणार प्रत्येकी 25,000 रूपये आगाऊ रक्कम

म्हाडाचे राज्यभरात सुमारे 2 हजार कर्मचारी अधिकारी पदावर आहेत. त्यांना आता सातव्या आयोगाच्या शिफारसीनुसार लाभ मिळणार आहेत. काही महिन्यांपूर्वी प्राधिकरण बैठकीमध्ये प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून दरम्यान राज्यातील विधानसभा निवडणूकींमुळे त्याच्या अंमलबजावणीची प्रक्रिया लांबणीवर पडली होती. आता अधिकार्‍यांच्या पगारवाढीचा मार्ग मोकळा खुला झाला आहे. येत्या काही दिवसात नव्य पगाराचा आकडा कर्मचारी अधिकार्‍यांना पहायला मिळेल अशी अपेक्षा आहे. दरम्यान ही प्रक्रिया वेळखाऊ असल्याने नोव्हेंबर महिन्याचा पगार लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. मात्र वाढीव पगार मिळणार असल्याने कर्मचार्‍यांमध्येही उत्सुकता आहे. 7th Pay Commission: मोदी सरकार केंद्रीय कर्मचार्‍यांना 'किमान वेतन वाढ' प्रस्तावाला मंजुरी देत नववर्षाची भेट देणार?

केंद्रामध्ये आता ग्रुप डी कर्मचार्‍यांचे किमान वेतन वाढवण्यासाठी हालचाली सुरू आहेत. डिसेंबर 2019 च्या शेवटापर्यंत आता यावर मोदी कॅबिनेटकडून शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. राज्यासह देशभरातील कर्मचार्‍यांचे या प्रस्तावाच्या मंजुरीकडे डोळे लागले आहेत.