महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग बैठकीनंतर आज 5 वाजता राज्यातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्रात 14 एप्रिल नंतर सुद्धा लॉक डाऊन (Maharashtra Lock Down) कायम राहणार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. 30 एप्रिल पर्यंत महाराष्ट्रात लॉक डाऊन राहणार आहे, यावेळी 14 नंतर कोणत्या गोष्टीत बदल होईल याविषयी लवकरच माहिती देण्यात येईल. मात्र यावेळी सुद्धा शेतीची कामे आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कायम राहणार आहे, अशा वेळी लोकांची गैरसोय होईल याला पर्याय नाही मात्र सर्वांनी शिस्तीचे पालन करावे आणि आजपर्यंत जसे धैर्य दाखवले तसे कायम ठेवावे असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे. Coronavirus Lockdown: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधणार नाहीत- सुत्रांची माहिती
मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या ही महाराष्ट्रातल्या संख्येच्या तुलनेत निम्म्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे ज्या भागात आवश्यकता आहे तिथे लॉकडाउनचे नियम कठोर करण्यात येतील. तर काही ठिकाणी जिथे कोरोनाचा धोका कमी आहे तिथे हे नियम काहीसे शिथिल होतील मात्र 14 एप्रिल नंतर लॉक डाऊन हटवण्यात येणार नाही असे उद्धव यांनी लाईव्ह च्या माध्यमातून स्पष्ट केले. Coronavirus: तुमच्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण? किती जणांचा मृत्यू? घ्या जाणून
तसेच महाराष्ट्रातील रुग्णांच्या आकड्यावर बोलताना ही परिस्थिती निश्चितच गंभीर आणि चिंताजनक असली तरी वाढत्या चाचण्या हे रुग्ण समोर येणायचे कारण ठरत आहेत असेही उद्धव यांनी सांगितले. हाराष्ट्रात आतापर्यंत 33 हजार कोरोना चाचण्या झाल्या आहेत. यातून 1000 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सुदैवाची बाब अशी की यातील गंभीर प्रकरणे अगदी कमी आहेत अन्य सर्व रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. मुंबई पुणे येथील महापालिका आता स्वतः घरच्याघरी जाऊन चाचण्या करत आहेत. मुंबईत आतापर्यंत 19 हजार चाचण्या झाल्या आहेत. सद्य घडीला महाराष्ट्रात 1666 कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत,
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना शिस्त पाळण्याचे आवाहन करताना शिस्त पाळली तर कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होईल असे ही सांगितले आहे. ज्यांना वर्क फ्रॉम होम करणे शक्य आहे ते त्यांनी कायम सुरु ठेवावे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी तर सरकार जबाबदारी घेईल असे ही उद्धव ठाकरे यांनी म्हटले असून आपण कोरोनाच्या विरोधातील लढाई आपण जिंकणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.