Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

महाराष्ट्र (Maharashtra) राज्यातील कोरोना व्हायरस (Coronavirus) बाधित एकूण रुग्णांपैकी तुमच्या जिल्ह्यातील रुग्णांची संख्या तुम्हला माहिती आहे काय? त्यातील किती रुग्णांचा मृत्यू झाला. किती उपचार घेत आहेत याबाबत सविस्तर माहिती आम्ही इथे देत आहोत. अर्थात ही अधिकृत आकडेवारी आहे. त्यामुळे ही आकडेवारी द्यायला काहीसा विलंब होतो हे खरे आहे. ही आकडेवारी काल म्हणजेच 10 एप्रिल 2020 च्या सांयकळी 6 वाजताची आहे. आजची आकडेवारी (11 एप्रिल) आज सायंकाळी किंवा रात्री उशीरा समजू शकेल. जाणून घ्या महाराष्ट्रात कोणत्या राज्यात कोरोना व्हायरस बाधित किती रुग्ण? किती जणांचा मृत्यू?

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस तपासणीसाठी आवश्यक चाचण्या मोठ्या प्रमाणावर केल्या जात आहे. परिणामी महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्याही वाढताना दिसत आहे. संख्या वढली तरी घाबरण्याचे कारण नाही. आपण चाचण्या मोठ्या प्रमाणावर करत आहोत. त्यामुळे ही वाढ दिसणे स्वाभाविक आहे, असे राज्याचा आरोग्य विभाग वारंवार सांगतो आहे. दरम्यान, अधिकाधिक चाचण्या केल्यामुळे कोरना व्हायरस नियंत्रणात ठेवण्यासाठी अधिक फायदा होईल, असे तज्ज्ञ सांगत आहेत. (हेही वाचा, Coronavirus Outbreak: कोरोना बाधितांच्या आकडेवारीत सर्वात मोठी वाढ; 24 तासात 40 बळी, 1035 जणांना लागण, देशातील रुग्णांचा आकडा 7447 वर)

कोविड-1९ महाराष्ट्र राज्याची जिल्हा/मनपा निहाय सध्या स्थिती

(*आकडेवारी दि. 10 एप्रिल 2020, सायं 6.00)

अ.क्र. जिल्हा/मनपा बाधित रुग्ण मृत्यू
1 मुंबई मनपा 1008 64
2 ठाणे 3 0
3 ठाणे मनपा 28 3
4 नवी मुंबई मनपा 32 2
5 कल्याण डोंबिवली मनपा 34 2
6 उल्हासनगर मनपा 1 0
7 भिवंडी निजामपूर मनपा 0 0
8 मीरा भाईंदर 21 1
9 पालघर 3 1
10 वसई विरार मनपा 12 3
11 रायगड 0 0
12 पनवेल मनपा 6 1
ठाणे मंडळ एकूण 1148 77
1 नाशिक 1 0
2 नाशिक मनपा 1 0
3 मालेगाव मनपा 5 1
4 अहमदनगर 9 0
5 अहमदनगर मनपा 16 0
6 धुळे 0 0
7 धुळे मनपा 0 0
8 जळगाव 1 0
9 जळगाव मनपा 1 1
10 नंदुरबार 0 0
नाशिक मंडळ एकूण 34 2
1 पुणे 7 0
2 पुणे मनपा 219 25
3 पिंप्री-चिंचवड मनपा 22 0
4 सोलापूर 0 0
5 सोलापूर मनपा 0 0
6 सातारा 6 1
पुणे मंडळ एकुण 254 26
1 कोल्हापूर 0 0
2 कोल्हापूर मनपा 5 0
3 सांगली 26 0
4 सांगली मिरज उपवाड मनपा 0 0
5 सिंधुदुर्ग 1 0
6 रत्नागिरी 5 1
कोल्हापूर मंडळ एकुण 37 1
1 औरंगाबाद 1 0
2 औरंगाबाद मनपा 16 1
3 जालना 1 0
4 हिंगोली 1 0
5 परभणी 0 0
6 परभणी मनपा 0 0
औरंगाबाद मंडळ एकूण 19 1
1 लातूर 0 0
2 लातूर मनपा 8 0
3 उस्मानाबाद 4 0
5 बीड 1 0
6 नांदेड 0 0
7 नांदेड मनपा 0 0
लातूर मंडळ एकूण 13 0
1 अकोला 0 0
2 अकोला मनपा 12 0
3 अमरावती 0 1
4 अमवरावती मनपा 4 1
5 यवतमाळ 4 0
6 बुलढाणा 13 1
7 वाशीम 1 0
अकोला मंडळ एकूण 34 2
1 नागपूर 0 0
2 नागपूर मनपा 25 1
3 वर्धा 0 0
4 भंडारा 0 0
5 गोंदिया 1 0
6 चंद्रपूर 0 0
7 चंद्रपूर मनपा 0 0
8 गडचिरोली 0 0
नागपूर मंडळ एकूण 26 1
1 इतर राज्य 9 0
एकूण 1574 110

कोरोना व्हायरस संकट मोठे अव्हान बणून राहिल्यामुळे सहाजिकच देश आणि राज्यातील विविध गोष्टींकडे फारसे लक्ष दिले जात नाही असे दिसते. यात कोरोना व्हायरस संसर्ग नसलेल्या पण, इतर आजार असलेल्या सर्वसामान्य नागरिकांवर होणारे उपचार. त्यांना येणाऱ्या अडचणी हा मुद्दा फारसा चर्चेत आला नाही. मात्र, वास्तवात सर्वसामान्य आजार असलेल्या आणि उपचार मिळत नसलेल्या नागरिकांचेही प्रमाण मोठे आहे.