Congress | (File Photo)

काँग्रेस (Congress) पक्षाने येत्या 21 मे रोजी पार पडणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषद निवडणूकीसाठी युवा नेते राजेश राठोड (Rajesh Rathod) यांना उमेदवारी दिली आहे. माणिकराव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ, रजनी पाटील आणि नसीम खान यांच्यासह अन्य नावांची चर्चा होती.  मात्र विधान परिषद निवडणूकीसाठी दिग्गजांना डच्चू दिल्याने चर्चा सुरु झाली आहे. तर राठोड हे महाराष्ट्रातील मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील आहेत. काँग्रेसच्या एका नेत्याने विधान करत असे म्हटले आहे की, राठोड यांना उमेदवारी देत युवा आणि ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. महाराष्ट्रात विधान परिषद निवडणूका 9 जागांसाठी होणार आहे. विधानसभेसाठी चार जागा भाजप आणि पाच जागा शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या युतीसाठी देण्यात येणार आहे. शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे.

कोरोना संकटामुळे विधानसभेच्या कोणत्याही जागेवर पोटनिवडणूक शक्‍य होणार नाहीत. पण अशा परिस्थितीत महा विकास आघाडी सरकारने राज्यपाल कोट्यातील विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे यांना उमेदवारी देण्यासाठी विनंती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांना उमेदवारी देण्याऐवजी राज्यपाल कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाला विधानपरिषदेच्या रिक्त जागांवर निवडणुका घेण्याची विनंती केली. कोश्यारी यांच्या विनंतीनुसार, आयोगाने विशेष परिस्थितीचा उल्लेख करून निवडणूक घेण्याचे ठरविले आहे.(विधान परिषद निवडणूक: भाजपच्या जागावाटपावरुन केंद्रीय मत्री रामदास आठवले नाराज)

दरम्यान, उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद अबाधित ठेवण्यासाठी या निवडणूकीला सर्वाधिक महत्व आहे. 2019 मध्ये 29 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. मात्र शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यात त्यांना विधिमंडळामध्ये निवडून येणे गरजेचे होते अन्यथा त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागेल. अशावेळेस राज्य मंत्रिमंडळाकडून दोनदा विधानपरिषदेवर राज्यपाल कोट्यातून उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कोमोर्तब करून त्यांना नियुक्ती व्हावी असा प्रस्ताव देण्यात आला होता. सध्या महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने निवडणूकीच्या वेळी मार्गदर्शक सुचनांची नियमावली जाहीर करण्यात आली आहे.