Uddhav Thackeray | Photo Credits: Twitter/ ANI

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून आज विधान परिषदेमध्ये आमदारकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आज त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य ठाकरे उपस्थित आहे. आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत महाविकास आघाडीच्या 4  अन्य उमेदवारांनी देखील आपला अर्ज दाखल केला आहे. यामध्ये शशिकांत शिंदे, निलम गोर्‍हे, राजेश राठोड, अमोल मिटकरी यांचा समावेश आहे. दरम्यान महाराष्ट्रात 21 मे दिवशी विधान परिषद निवडणूक पार पडणार आहे. ही निवडणूक बिनविरोध होणार आहेत. शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ डॉ. निलम गोर्‍हे या उमेदवार आहेत. महाराष्ट्रात विधान परिषद निवडणूका 9 जागांसाठी होणार आहे. विधानसभेसाठी चार जागा भाजप आणि पाच जागा शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या युतीसाठी देण्यात येणार आहे. महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 21 मे दिवशी मुंबई मध्ये होणार; उद्धव ठाकरे यांना मोठा दिलासा.

ठाकरे कुटुंबाकडून आदित्य ठाकरे पाठोपाठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आमदार म्हणून सक्रिय राजकारणात हा प्रवेश आहे. दरम्यान 28 नोव्हेंबर दिवशी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. आता त्यांना पुढील सहा महिन्यात आमदारकी मिळवणं गरजेचे होतं. त्यासाठी कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विधनपरिषद निवडणूक न घेता त्याच्या ऐवजी राज्यपाल नियुक्तीने त्यांची नेमणूक व्हावी असा प्रयत्न झाला होता. मात्र त्यामध्ये काही तांत्रिक चूका दाखवत नियुक्ती ऐवजी निवडणूक घेण्याचा निर्णय झाला. Maharashtra Legislative Council Election 2020: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे यांची राजकीय कारकीर्द

उद्धव ठाकरेंकडून अर्ज दाखल 

शशिकांत शिंदे,  अमोल मिटकरी यांच्याकडून अर्ज दाखल 

भारतीय जनता पक्षाने  उमेदवारांची यादीही जाहीर केली. या यादीत प्रविण दटके (Pravin Datke), गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar), अजित गोपछडे (Ajit Gopchade) आणि रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) यांना उमेदवारी देण्यात आली.

Vidhan Parishad Election : कॉंग्रेसने उमेदवार मागे घेतल्यानंतर Uddhav Thackeray बिनविरोध निवडून येतील? - Watch Video

आज उद्धव ठाकरेंचा उमेदवारी अर्ज विधानसभेमध्ये दाखल करताना महाविकास आघाडीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते. त्यासोबतच शिवसेनेचेही अनेक बडे नेते यावेळेस उपस्थित होते.