CM Uddhav Thackeray on ED: ईडी आहे की घरगडी? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानसभेत फटकेबाजी
CM Uddhav Thackeray | (Photo Credits: CMO)

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी जोरदार फटकेबाजी केली. आज केंद्रीय तपास यंत्रणांच्या (CM Uddhav Thackeray on ED) माध्यमातून नाहक त्रास दिला जातो आहे. खरे म्हणजे, आजकाल कळतच नाही 'ईडी आहे की घरगडी' (CM Uddhav Thackeray on ED) आहे. पुर्वी बाणाने लक्ष्य केले जायचे. बाण सोडले जायचे. मात्र, आज केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून लक्ष्य ठरवले जाते बाण हातात दिला जातो आणि मग तो घुसवला जातो, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर आणि केंद्रीय तपास यंत्रणांसह केंद्र सरकारचाही जोरदार समाचार घेतला.

टीका करणे आम्ही समजू शकतो. परंतू, सत्ता मिळविण्यासाठी एकमेकांच्या कुटुंबांची बदनामी करण्याचा जो प्रकार सुरु आहे तो अतीशय निंदनीय आणि नीच प्रकार आहे, अशा सडेतोड शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर प्रहार केला. आज सत्ता नसल्याने विरोधकांचा जा जीव जळतो आहे. जर तुम्हाला सत्ताच हवी असेल तर मी येतो तुमच्या सोबत. टाका मला तुरुंगात. ज्या ठिकाणी कृष्टाचा जन्म झाला तशा तळघरातील तुरुंगातही मी जायला तयार आहे. मी कृष्ण नाही. हे सांगायला मी तयार आहे. पण तुम्ही कंस नाही हे आगोदर तुम्हाल सिद्ध करावे लागेल. आज काही लोक केंद्रीय तपास यंत्रणांचे दलाल आहेत की प्रवक्ते हेच कळायला तयार नाही. आगोदर हे लोक आरोप करतात. मग त्याची चौकशी लागते. तत्पूर्वी हे लोक आमका तमका तुरुंगात जाणार असे सांगतात. पुढे तो तुरुंगात जातो. हा प्रकार निंदनीय आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (हेही वाचा, ED Attaches Assets of Pratap Sarnaik: ईडीने 11.35 कोटींची संपत्ती जप्त केल्यावर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आक्रमक, काय म्हणाले पाहा?)

काही चुकत असेल तर टीका करा. टीका आणि बदनामीला आम्ही घाबरत नाही. परंतू, आपण जी कुटुंबीयांची बदनामी करता आहात ते चुकीचे आहे. आज अनिल देशमुख, नवाब मलिक तुरुंगात आहेत. नवाब मलिक यांना थेट दाऊदचा हस्तक ठरवले जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणा इतक्या कुचकामी आहेत का? ज्यांना दाऊदचा माणूस महाराष्ट्रात आमदार होतो. निवडून येतो. मंत्री होतो आणि केंद्रीय तपास यंत्रणांना हे माहित नसतं. तेही अनेक वर्षे? पहाटेच्या शपथविधीचे सरकार विधिमंडळात टीकले असते तर आज आपण अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या मांडीला मांडी लावून बसला असता की नाही? असा थेट सवाल विचारत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सुनावले.