Heatwave | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रात यंदा होळीपूर्वीच उन्हाचे चटके बसायला सुरूवात झाली आहे. विदर्भात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट पसरली आहे. उष्णतेचा पारा कमाल 40-41 अंशांवर आहे त्यामुळे सध्या नागरिक उन्हाने हैराण झाले आहेत. हवामान विभागाने आज अकोला, चंद्रपूर, यवतमाळ मध्ये उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर

विदर्भाप्रमाणे उर्वरित महाराष्ट्रामध्येही उन्हाचा कडाका वाढला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये तापमान सामान्य पेक्षा अधिक नोंदवण्यात आले आहे. सोलापूरातही आज सलग तिसर्‍या दिवशी तापमान 40 अंशापेक्षा अधिक नोंदवण्यात आले आहे. कोल्हापूरामध्ये मात्र हवामान विभागाकडून वादळी वार्‍यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट घेण्याची शक्यता आहे.

पहा आयएमडीचा अंदाज काय आहे?

आयएमडीच्या अंदाजानुसार, पुढील 5 दिवसामध्ये कोकण-गोवा या भागामध्ये कमाल तापमान 2-3 अंश कमी होण्याचा अंदाज आहे तर किमान तापमान देखील बदलणार आहे. उत्तरी भागात किमान तापमान 1-2°C ने कमी होण्याची शक्यता आहे.