Maharashtra Gudi Padwa Bumper Lottery Result 2022: महाराष्ट्र गुढीपाडवा बंपर लॉटरीचा निकाल जाहीर, Winner List पहा इथे
Representational Image | Lottery (File Image)

Gudhi Padwa Bumper Lottery Result 2022: महाराष्ट्र गुढीपाडवा  बंपर लॉटरीचं तिकीट तुम्ही काढलं का? मग आजचा दिवस तुमच्यासाठी खास आहे. आज या लॉटरीच्या निकालाचा दिवस आहे.  या लॉटरीच्या तिकीटाची किंमत 200 रुपये इतकी होती. मात्र बक्षीसातून तुम्हाला भरगोस रक्कम जिंकता येणार आहे. महाराष्ट्र राज्य लॉटरी स्कीम अंतर्गत महाराष्ट्र सरकारतर्फे या लॉटरीचे बक्षीस वितरण करण्यात येते. ही लॉटरी ऑनलाईन पद्धतीची असून पहिलं बक्षीस 51 लाखांचे आहे. तर द्वितीय विजेत्याला 10 लाखांचे बक्षीस मिळणार आहे. या व्यतिरिक्त इतर अनेक बक्षीसांचे वितरण देखील लॉटरी अंतर्गत करण्यात येईल. परंतु, लॉटरीचं निकाल नेमका कुठे आणि कधी पाहायचा हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर lottery.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर आज दि. १२ एप्रिल २०२२, दु. ४ वाजता होणार प्रदर्शित. गुढीपाडवा बंपर लॉटरी निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा. त्यासाठी जाणून घेऊया काही सोप्या स्टेप्स:

अधिकृत वेबसाईटवर कसा तपासाल निकाल?

# lottery.maharashtra.gov.in ला भेट द्या.

# त्यानंतर 'result' लिंकवर क्लिक करा.

# तिथे तुम्हाला गुढीपाडवा  बंपर ड्रा दिसेल.

# त्या लिंकवर क्लिक करा. एक पीडीएफ फाईल ओपन होईल.

# तुमचा लॉटरी नंबर विजेत्या नंबर्ससोबत तपासून पहा.

# तो नंबर सारखाच असल्यास तुम्हाला बक्षीसाची रक्कम नक्कीच मिळेल.

दरम्यान, 10,000 रुपयांपर्यंतची रक्कम जिंकणारी व्यक्ती रिटेल एजेंट्स कडून आपले बक्षीस घेऊ शकतात. तर 10,000 पेक्षा अधिक रक्कम जिंकणाऱ्या विजेत्यांना Dy. Director, Lotteries, Sewree येथे क्लेम करावा लागेल.