राज्यासह मुंबईत कोरोनाच्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक वेगाने वाढत चालला आहे, त्यामुळे राज्य सरकारकडून नागरिकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करावे असे वारंवार आवाहन केले जात आहे. तर संचारबंदीसह आता राज्य सरकारने मिनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. अशातच आता मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण मुंबईत दरदिवसाला 10 हजारांपेक्षा अधिक रुग्णांचा आकडा आढळून येत आहे. त्यामुळे उपनगरीय प्रवास नागरिकांसाठी अगदी सोईस्कररित्या करणाऱ्या मुंबई लोकलवर पुन्हा एकदा निर्बंध येण्याची शक्यता आहे. या संदर्भात राज्य सरकार कडून विचार केला जात असल्याचे विधान पुर्नविकासमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.(Pune: कोरोनाच्या संसर्गानंतर Home Quarantine मध्ये उपचार घ्यायचे असल्यास 25 हजाराच्या बाँडवर सही करावी लागेल; प्रशासनाचा नवीन नियम)
राज्यात गेल्या वर्षी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर लोकवर सुद्धा निर्बंध लादण्यात आले होते. तेव्हा सुरुवातीला फक्त अत्यावश्यक सेवासुविधांमधील नागरिकांना प्रवास करण्यासाठी परवानगी होती. मात्र परिस्थिती हळूहळू सुधारत असल्याचे दिसून आल्यानंतर पुन्हा लोकल सामान्यांसाठी ठरवून दिलेल्या वेळेत सुरु केली आहे. मात्र सध्या लोकमध्ये सुद्धा गर्दी होताना दिसून येत आहे. अशातच आता गेल्या वेळसारखेच यावेळी सुद्धा निर्बंध लागू करण्याबद्दल राज्य सरकारकडून विचार केला जात आहे. त्यामुळे आता लोकवर निर्बंध लादल्यास काय होणार असा विचार सर्वसामान्यांना पडू लागला आहे.(पुणे: यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल पूर्णपणे 'कोविड रुग्णालय' म्हणून समर्पित)
दरम्यान, मुंबई मध्ये कोविड 19 लसीचा तुटवडा निर्माण होत असल्याचं चित्र असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. दरम्यान काल राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील लस पुरवठा करण्याबाबात केंद्राशी बोलणी सुरू असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे देशात सध्या लसीकरणामध्ये अव्वल असलेल्या महाराष्ट्राला कोविड 19 लसीचा अधिकचा पुरवठा करावा असे आवाहन पेडणेकर यांनी केले आहे.