आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाच्या किमती उतरल्या असून भारतात गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने केंद्र सरकारच्याविरोधात देशव्यापी आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनावर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी टीका केली आहे. काँग्रेसचे आंदोलन बेगडी असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. पेट्रोल, डिझेलची कॉस्ट सी थ्रू आहे. राज्याने पेट्रोल डिझेलवर टॅक्स लावल्यानेचे पेट्रोल डिझेलचे भाव वाढले आहेत. त्यामुळे हे आंदोलन बेगडी आंदोलन आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
आंतराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती स्थिर असूनही भारतात पेट्रोल- डिझेलच्या किंमती वाढतात कशा, हे अनाकलनीय गणित केंद्र सरकारने देशाला समजावून सांगावे, असे राज्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. दरम्यान, पेट्रोल- डिझेलच्या सातत्याने वाढत असलेल्या दरांच्या विरोधात कॉंग्रेसने आज देशव्यापी आंदोलन केले आहे. हे देखील वाचा- कोरोना संकट दूर करण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं पंढरपूरच्या विठूरायाला साकडे
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
पेट्रोल, डिझेल कॉस्ट सी थ्रू आहे. राज्याने पेट्रोल, डिझेलवर टॅक्स लावला आहे. त्यामुळे राज्य सरकारनेच पेट्रोल, डिझेलचे भाव वाढवले आहेत. त्यामुळे काँग्रेसचे हे आंदोलन बेगडी असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. दरम्यान, कापूस खरेदी संदर्भात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. विहित मुदतीत राज्य सरकार कापुस खरेदी करू शकले नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. तर केंद्र सरकार कापूस खरेदी करायला तयार होते. त्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला 5 हजार 700 कोटी रुपये दिले आहेत, असेही त्यांनी सांगितले आहे. तर, बोगस बियाणे संदर्भात दोषीवर कारवाई झाली पाहिजे, पण आज शेतकऱ्यांचे नुकसान कोण भरपाई करुन देणार? त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, बोगस बियाणे संदर्भात कायद्याप्रमाणे कारवाई करावी तर शेतकऱ्यांचे यात रीतसर अर्ज घ्यावे, असेही फडणवीस म्हणाले आहेत.
देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत रविवारी एक दिवस कोणतीही वाढ झाली नाही. मात्र, आज सोमवारी पुन्हा एकदा इंधन दरवाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत आज पेट्रोलच्या दरात 5 पैशांची तर डिझेलच्या दरात 13 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता दिल्लीत पेट्रोलचा दर 80.43 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 80.53 रुपये प्रति लीटर इतका झाला आहे.