गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) व आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी आज आषाढी एकादशीची वारी आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला (Pandharpur) भेट देऊन सुरक्षा व आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी अनिल देशमुख यांनी विठ्ठलाला कोरोनामुक्तीचे साकडे घातले. 'विठू माऊली तू माऊली जगाची, आर्त साद तुज ही कोरोनामुक्तीची,' असे सांगत संपूर्ण जगातून, भारत व महाराष्ट्राला कोरोनामुक्त तर आणि शतकांपासून चालत आलेली वारीची परंपरा पूर्ववत लवकरचं सुरू होण्यासाठी आशिर्वाद असू द्या, अशी विनंतीदेखील यावेळी अनिल देशमुख यांनी केली. यावेळी अनिल देशमुखम म्हणाले की, पालखी सोहळ्याबाबत शासनस्तरावर घेण्यात येणारा निर्णय नागरिक आणि भाविकांच्या हिताचा असेल. त्या निर्णयाबाबत भाविकांनी व जनतेने सहकार्य करावे, असं आवाहनही यावेळी अनिल देशमुख यांनी केलं. (हेही वाचा - Coronavirus Cases In Maharashtra: महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा हाहाकार! राज्यात आज 5493 नव्या कोरोना बाधीत रुग्णांची नोंद, तर 156 जणांचा मृत्यू)
#COVID_19 संसर्ग व आषाढी एकादशी यांच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री @AnilDeshmukhNCP व आरोग्य मंत्री @rajeshtope11 यांच्याकडून पंढरपूर येथील सुरक्षा व आरोग्य व्यवस्थेची पाहणी. पालखी सोहळ्याबाबत शासन स्तरावर घेण्यात येणारा निर्णय भाविकांच्या हिताचा, याबाबत सहकार्य करण्याचे आवाहन. pic.twitter.com/NvRxV71BlR
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 28, 2020
दरम्यान, यावेळी अनिल देशमुख यांना वीणा, वारकरी पारंपरिक पोशाख, तुळशी हार देण्यात आला. तसेच पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीच्या अनुषंगाने सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती अनिल देशमुख यांना दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी आणि जनतेने आरोग्याच्या दृष्टीने पंढरपुरात येऊ नये. घरातूनचं विठ्ठलाचे नामस्मरण व पूजा करावी, असं आवाहन सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी केलं. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार भारत भालके, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, अतिरिक्त पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, प्रांताधिकारी सचिन ढोले, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी आदी उपस्थित होते.