Coronavirus Cases In Maharashtra: राज्यात आज 5493 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली असून 156 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधीत रुग्णांची संख्या आता 164626 अशी झाली आहे. आज नवीन 2330 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 86575 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. तसेच सध्या राज्यात एकूण 70607 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यासंदर्भात राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे.
दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या संख्येने वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरत आहे. राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण हे मुंबई शहर, ठाणे, पुणे, जळगाव, औरंगाबाद या ठिकाणी आढळून येत आहेत. आज मुंबईतील धारावीत 13 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर औरंगाबादमध्ये आज 208 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे औरंगाबाद मधील कोरोनाबाधितांचा आकडा 4974 वर पोहचला आहे. (हेही वाचा - Coronavirus In Dharavi: धारावीत आज 13 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह)
Maharashtra reports 156 deaths and 5493 new #COVID19 positive cases today. Out of 156 deaths, 60 occurred in the last 48 hours and 96 from the previous period. The total number of cases in the state reaches 1,64,626 including 70,607 active cases: State Health Department pic.twitter.com/tFTyAtaiKQ
— ANI (@ANI) June 28, 2020
दरम्यान, भारतात मागील 24 तासांत 19,906 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले. तसेच 410 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 5 लाख 28 हजार 859 इतकी झाली आहे. याशिवाय आतापर्यंत 16,095 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशात 2,03,051 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर 13,832 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशात आतापर्यंत 3,09,713 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.