Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 29, 2025
ताज्या बातम्या
3 hours ago

Maharashtra Government Formation: अभिनंदनाच्या भाषणातून टोलेबाजी करणा-या सत्ताधा-यांना देवेंद्र फडणवीसांनी एका शायरीमधून दिले उत्तर

महाराष्ट्र Poonam Poyrekar | Dec 01, 2019 03:13 PM IST
A+
A-
01 Dec, 15:13 (IST)

अभिनंदनाच्या भाषणातून आपल्यावर टोलेबाजी करणा-या सत्ताधा-यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका शायरी मधून कडक शब्दांत उत्तर दिले. 'मी पुन्हा येईन असे म्हणालो होतो मात्र मी टाईमटेबल सांगितलं नव्हतं' असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 'मेरा पाणी उतरता देख मेरे किनारे पे घर मत बसा लेना मैं समंदर हूं फिर लौटकर वापस आऊंगा' या शायरीमधून त्यांनी सत्ताधा-यांना इशारा दिला. 

01 Dec, 14:12 (IST)

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी विरोधी नेते म्हणून नेमणूक झालेल्या देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करत त्यांच्यावर टोलेबाजीही केली. 'तुम्ही एका रात्रीत काय कराल याचा काहीच नेम नाही' असे म्हणत मी पुन्हा येईल असे तुम्ही म्हणालेलात आणि तुम्ही पुन्हा येथे आलात याचा मला अभिमान आहे असा टोलाही भुजबळांनी फडणवीसांना लगावला.

01 Dec, 13:17 (IST)

देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून नेमणूक झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे अभिनंदन केले. यासंदर्भात सविस्तर भाषण करत असताना त्यांनी 'मी इथे येईन असे कधीच बोललो नव्हतो तरी आलो' असे म्हणत देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला. 

01 Dec, 13:06 (IST)

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेते म्हणून घोषणा केली व त्यांना विरोधी पक्षनेतेपदी विराजमान होण्याची विनंती केली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सभागृहातील अन्य नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

01 Dec, 12:00 (IST)

उंची असलेला अध्यक्ष आज सभागृहाला मिळाल्यामुळे आता येथील कामकाजाची देखील उंची वाढेल अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे अभिनंदन केले. हे अध्यक्ष शेतकरी घरातून आल्यामुळे निश्चितच महाराष्ट्रातील तमाम शेतक-यांना न्याय मिळेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

01 Dec, 11:13 (IST)

विधानसभा अधिवेशनला सुरुवात झाली असून हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी नाना पटोले यांचे विधानसभा अध्यक्ष म्हणून नाव घोषित केले आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नाना पटोले यांना स्थानापर्यंत आणण्याची विनंती केली.  उद्धव ठाकरे यांनी नाना पटोले यांचे संपुर्ण सभागृहाच्या वतीने अभिनंदन केले. 

01 Dec, 11:03 (IST)

विधानसभा विशेष अधिवेशनला सुरुवात झाली असून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पासून अन्य नेत्यांनी भाषणाला सुरुवात केली आहे.

01 Dec, 10:58 (IST)

विधिमंडळात आज दुपारी 4.00 वाजता राज्यपालांचे अभिभाषण होणार आहे. या अभिभाषणात राज्यपाल संयुक्त सभागृहाला संबोधित करणार आहेत. 

01 Dec, 10:47 (IST)

विधानसभा अध्यक्षपदांच्या बिनविरोध निवडीनंतर आता विधानसभेच्या कामकाजात मोठा बदल करण्यात आला आहे. त्यानुसार विरोधी पक्षनेतेपदाची निवड आजच होणार असे सांगण्यात आले आहे. यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच विरोधी पक्षनेते होतील असे सांगण्यात येत आहे. 

01 Dec, 10:02 (IST)

भाजपचे उमेदवार किसन कथोरे यांनी अर्ज मागे घेतल्याने काँग्रेसचे नेते नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्षपदासाठी नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली. सकाळी 11.00 वाजता कामकाज सुरु होण्यापूर्वी या बाबतीत घोषणा केली जाईल, असे सांगण्यात येत आहे. 

Load More

शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्विकारल्यानंतर शनिवारी त्यांच्या नव्या सरकारसाठी कालचा दिवस फार निर्णायक होता. कारण या नवीन सरकारला बहुमत सिद्ध करायचे होते. विरोधकांच्या गदारोळानंतर आणि सभात्यागानंतर विधानभवनाता एक ऐतिहासिक विश्वासदर्शक ठराव झाला. ठाकरे सरकारला 169 आमदारांचे समर्थन मिळून त्यांना आपल्या सरकारचे बहुमत सिद्ध केले. ठरावाप्रसंगी एमआयएमचे दोन तसेच मनसे व माकपच्या प्रत्येकी एका आमदाराने तटस्थ भूमिका घेतली. तर भाजपन सभागृहातून सभात्याग केल्याने विश्वासदर्शक ठराव प्रस्तावाच्या विरोधात शून्य मते पडली. याचाच पुढचा भाग म्हणून आज विधानसभा अध्यक्ष पदासाठी निवडणूक (Vidhan Sabha Speaker Election) होणार आहे. आज सकाळी 11.00 वाजता विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरु होईल.

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या उद्धव ठाकरे यांच्या सरकारने राज्यपालांच्या सूचनेनुसार विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावले होते. त्यानुसार शनिवारी सभागृहाचे काम सुरू होताच हंगामी अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील यांच्या नावाची घोषणा झाली. कामकाज सुरू होताच विधिमंडळाचे भाजप गटनेते देवेंद्र फडणवीस यांनी हरकतीचा मुद्दा मांडत मुख्यमंत्री तसेच इतर मंत्र्यांचा शपथविधी, हंगामी अध्यक्ष बदलणे हे नियमबाह्य असल्याचा आक्षेप नोंदवला. Maharashtra Government Formation: उपमुख्यमंत्री पदाची नियुक्ती 22 डिसेंबरला होणार; प्रफुल्ल पटेल यांची माहिती

विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणूकीसह आज मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यातील अनेक दिग्गज नेत्यांमध्ये चुरस लागली आहे. त्यामुळे आजच्या विशेष अधिवेशनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Show Full Article Share Now