Nawab Malik, Sanjay Raut (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्राच्या सत्ता पेचावर आज सर्वोच्च न्यायायामध्ये सुनावणी करताना कोर्टाने राज्यातील देवेंद्र फडणावीस यांच्या सरकारला उद्या म्हणजेच 27 नोव्हेंबर दिवशी बहुमत चाचणीला सामोरं जावं लागणार असल्याने आता राज्यात घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली स्थापन केलेल्या सरकारला आव्हान देत त्यांच्याकडे बहुमत नसल्याचं म्हटलं आहे. आज संविधान दिनादिवशी तातडीने विश्वासदर्शक ठराव घ्यावा या बाजूने सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णय देण्यात आल्याने महाविकासआघाडीच्या नेत्यांनी कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करत ट्विटरवर आपल्या प्रतिक्रिया आहेत. पहा संजय राऊत सह एनसीपी कडून पहा काय ट्वीट करण्यात आलं आहे. उद्याच बहुमत सिद्ध करा, गुप्त मतदान नको, लाइव्ह प्रक्षेपण करा; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, मुख्यमंत्री पद वाचविण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केवळ 30 तास.

संजय राऊत

शरद पवार

सुप्रिया सुळे

जयंत पाटील

रोहित पवार यांची प्रतिक्रिया

शिवसेनेची प्रतिक्रिया

पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया 

दरम्यान काल महाविकास आघाडी म्हणजे शिवसेना, कॉंग्रेस आणि एनसीपी या तिन्ही पक्षांच्या निर्वाचित आमदारांचं मुंबईतील 162 आमदारांचे शक्तीप्रदर्शन केले. यामध्ये शरद पवार, संजय राऊत, मलिक्कार्जुन खर्गे, उद्धव ठाकरे यांच्यासह महत्त्वाचे नेते आणि आमदार उपस्थित होते.