Maharashtra Government Formation: शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस (Shiv Sena-NCP-Congress) या पक्षांनी संयुक्तपणे दाखल केलेल्या याचिकवेर सर्वोच्च न्यायालयाने आज (26 नोव्हेंबर 2019) महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या निकालात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, कोणत्याही विलांबाशिवाय विधानसभा सद्यस्यांना 27 नोव्हेंबरच्या सायंकाळी पाचव वाजेपर्यंत शपथ देण्यात यावी. हा शपथविधी सायंकाळी (27 नोव्हेंबर) 5 वाजेपर्यंत पूर्ण करुन लगेचच बहुमत चाचणी घेण्यात यावी. ही चाचणी हंगामी व स्थायी अध्यक्षांची नेमणूक करून पार पडावी. तसेच, ही मतदान प्रक्रिया गुप्त मतदान पद्धतीने करण्याऐवजी उघडपणे करण्यात यावे तसेच, या पूर्ण प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण करण्यात यावे, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन.व्ही रामण्णा (Nuthalapati Venkata Ramana) यांनी या निकालाचे वाचन केले. न्यायलयाच्या निर्णयानंतर भाजपसमोर आणि खास करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तसेच अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासमोर बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन. व्ही रामन्ना यांच्या खंडपीठानं हा निर्णय देताना काही महत्त्वपूर्ण मतंही नोंदवली. या वेळी रामन्ना म्हणाले की, देशात लोकशाही मुल्ल्यांच संरक्षण होणं हे नागरिकांच्या हितासाठी आवश्यक आहे. जनतेला चांगलं सरकार मिळणं हा नागरिकांचा अधिकार आहे. त्यामुळे न्यायालयाला काही महत्त्वाचे आदेश देणे अत्यंत गरजेचे आहे. (हेही वाचा, देवेंद्र फडणवीस सरकारला 27 नोव्हेंबरला विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जावं लागणार: सर्वोच्च न्यायालय)
एएनआय ट्विट
Supreme Court orders Floor Test in the Maharashtra assembly to be held on November 27 before 5 pm. The proceedings shall be live telecast. https://t.co/SLrGeF6et1
— ANI (@ANI) November 26, 2019
एएनआय ट्विट
Kapil Sibal appearing for Shiv Sena-NCP-Congress alliance in Supreme Court, mentioned before the SC to restrain the Devendra Fadnavis Government from taking important policy decisions.
— ANI (@ANI) November 26, 2019
एएनआय ट्विट
Maharashtra government formation: Supreme Court orders open secret ballot; Pro-tem Speaker should be appointed to conduct Floor Test which should be completed before 5 pm tomorrow (Nov 27).
— ANI (@ANI) November 26, 2019
राज्याच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा असा हा निकाल आहे. मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस आणि भाजप तसेच अजित पवार यांच्यासाठीही हा निकाल प्रचंड महत्त्वाचा आहे. सरकार आणि पद वाचविण्यासठी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तसेच भाजपकडे बहुमत सिद्ध करण्यासाठी केवळ 30 तास उरले आहेत.
राज्यातील पक्षीय बलाबल पाहता भाजप (BJP) – 105, शिवसेना (Shiv Sena) – 56, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) – 54, काँग्रेस(Congress) – 44, बहुजन विकास आघाडी – 03, प्रहार जनशक्ती – 02, एमआयएम – 02, समाजवादी पक्ष – 02, मनसे – 01, माकप – 01, जनसुराज्य शक्ती – 01, क्रांतिकारी शेतकरी पक्ष – 01, शेकाप – 01, रासप – 01, स्वाभिमानी – 01, अपक्ष – 13 जागांवर विजयी झाले आहेत.