Maharashtra Government Formation: डिसेंबर पूर्वीच महाराष्ट्रात नवं सरकार येईल: संजय राऊत यांचे संकेत
Sanjay Raut | Photo Credits: Twitter/ ANI

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक निकाल (Maharashtra Vidhan Sabha Election Results) मागून आता महिना उलटायला आला तरीही सत्ता कोंडी कायम आहे. मतदारांनी महायुतीला कौल दिला असला तरीही मुख्यमंत्री पदावरून शिवसेना-भजापामध्ये तणाव असल्याने आता शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र येऊन राज्यात सत्ता स्थापनेसाठी बोलणी करत आहेत. आज दिल्लीत पत्रकारांशी बोलाताना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महाराष्ट्रात डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीला नवं सरकार स्थापन होऊ शकतं असा विश्वास व्यक्त केला आहे. सध्या शिवसेना- कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सत्ता स्थापनेची चर्चा अंतिम टप्प्यात आली असून येत्या काही तासांमध्ये चित्र स्पष्ट होणार असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आधार, पॅनकार्ड, पाच दिवसांचे कपडे घेऊन मुंबईत हाजीर हो.., शिवसेना आमदारांना पक्षनेतृत्वाचे आदेश

सध्या दिल्लीमध्ये संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. यासाठी संजय राऊत दिल्लीमध्ये पोहचले आहेत. आज दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सत्ता स्थापनेच्या घडामोडींची माहिती देण्यात आली आहे. पुढच्या 5-6 दिवसात महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेबद्दलचं चित्र स्पष्ट होईल असं सांगण्यात आलं आहे. 'प्रत्येक पक्षाची काम करण्याची विशिष्ट पद्धत असते. शिवसेनेत कारभार आदेशावर चालतो. पूर्वी बाळासाहेब ठाकरे आणि आता उद्धव ठाकरे आदेश देतात त्यामुळे सेनेत प्रक्रिया वेगवान आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांच्या सल्ल्यानुसार निर्णय घेतला जातो तर काँग्रेसमध्ये थोडी वेगळी पद्धत आहे. त्यांच्याकडं अनेक स्तरांवर चर्चा करून मग अंतिम निर्णय घेतला जातो त्यामूले एकूण सार्‍या निर्णयांना उशिर होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची कविता ट्विट करत संजय राऊत यांचा भाजपला चिमटा.

ANI Tweet  

महाराष्ट्रामध्ये 145 हा बहुमताचा आकडा आहे. त्याची जुळवाजुळवा करून सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार आहे. सध्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.