Sanjay Raut | Photo Credits: Twitter

गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आपल्या ट्विटद्वारे व्यक्त होताना दिसत आहेत. आज राऊत यांनी आपल्या ट्विटद्वारे भाजपला चिमटा काढला आहे. त्यांनी आज माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची कविता ट्विट केली आहे. (हेही वाचा - सोनिया गांधींनी घेतली मवाळ भूमिका; कॉंग्रेस नेत्यांना राष्ट्रवादीशी चर्चा करण्यास संमती, आज ठरणार नवा फॉर्म्युला?)

'आहुती बाकी, यज्ञ अधूरा, अपनो के विघ्नो ने घेरा, अंतिम जय का वज्र बनाने, नव दधीची हड्डिया गलाए, आओ फिर से दिया जलाए,' अशी अटलबिहारी वाजपेयींची कविता ट्विट केली आहे. राऊत यांना या कवितेतून आपल्याच लोकांनी यज्ञात विघ्न आणला आहे. त्यामुळे विजयासाठी पुन्हा एकदा दिवा लावणार असल्याचे सांगितले आहे. या कवितेतून राऊत यांनी नकळत भाजपला चिमटा काढला आहे.

संजय राऊत यांचे ट्विट - 

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेवरुन भाजप-शिवसेनेत वाद झाल्याचे चित्र स्पष्ट आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी शिवसेना पक्षाचाच मुख्यमंत्री होईल, अशी भूमिका घेतली आहे. सत्ता स्थापनेसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेची यांची दिल्ली येथे महत्त्वाची बैठक पार पाडणार आहे. कदाचित या बैठकीत या तिन्ही पक्षाची युती होऊन सत्तास्थापना होण्याची चिन्हं आहेत.