-बहुमत सिद्ध झाल्यानंतर सभागृह आणि महाराष्ट्राच्या जनतेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून आभार मानले आहेत.
-रविवारी पुन्हा एकदा सकाळी 11 वाजता विधानसभा सभागृहाचे कामकाज पार पडणार आहे.
Maharashtra Government Formation: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सभागृह आणि महाराष्ट्राच्या जनतेचे आभार
महाराष्ट्राचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी 28 नोव्हेंबरला शिवतीर्थावर शपथ घेतली. त्याच्यासोबत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षाच्या प्रत्येकी 2-2 नेते मंडळींचा सुद्धा मंत्री पदाचा शपथविधी सोहळा पार पडला. त्यानंतर शुक्रवारी उद्धव ठाकरे यांनी मंत्रलायात जाऊन अधिकृतरित्या पदाचा कारभार सांभाळण्यास सुरुवात केली. त्यांच्या या पहिल्या कॅबिनेट मंत्रीमंडळात शिवरायांच्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी 10 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्याचसोबत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आढावा घ्या असे आदेश सुद्धा उद्धव ठाकरे यांनी दिले असून यावर लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन केली आहे. तसेच दुपारी 2 वाजता विधानसभेचे कामकाज सुरु होणार आहे. या महाविकासआघाडीच्या सरकारला बहुमताचा ठराव आज विधानसभेत मंजूर करावा लागणार आहे. महाविकासआघाडीचेकडे संख्याबळ जवळजवळ 170 च्या घरात आहे. त्यामुळे बहुमत सिद्ध करण्यास कोणतीही अडचण येणार नाही अशी अपेक्षा केली जात आहे. तर नव्या विधानसभेच्या अधिवेशनाची तारीख देखील लवकरच जाहीर केली जाणार आहे.(मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे कारशेडबाबत घेतलेल्या निर्णयावर भाजपची टीका; 'अत्यंत घृणास्पद निर्णय !')
दरम्यान, विधानसभा निवडणुकीपासून सुरु असणाऱ्या महाराष्ट्र सत्तासंघर्षात संजय राऊत यांनी कमालीची लीड घेतली होती, शिवसेनेचा गाडा हाकताना अनेकदा त्यांनी पूर्व मित्रपक्ष भाजपवर घणाघाती हल्ले सुद्धा केले. आता तर अखेरीस सेनेचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर शिवसेना सत्तेच्या प्रश्नावर आणखीनच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.
तर काही दिवसांपूर्वी राजकीय भुकंप राज्यात पहायला मिळाला होता. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. यावर काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाने मिळून भाजपला सुप्रीम कोर्टात खेचले. सुप्रीम कोर्टाच्या बहुमत चाचणीच्या आदेशानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा आणि फडणवीस यांनी सुद्धा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.
Mumbai Lake Water Levels: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांत 96.29% पाणीसाठा
Mumbai Lake Water Levels: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांत 96.41% पाणीसाठा
Mumbai Local Accident: दिवा-मुंब्रा वळणावर महिला लोकल मधून पडली; सिग्नल मुळे टळला मोठा अनर्थ (Watch Video)
Mumbai Lake Water Levels: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत 96.44% पाणीसाठा