Ashok Chavan (Photo Credits-ANI)

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीचे निकाल लागल्यानंतर ते आतापर्यंत सत्ता स्थापन झाले नाही. याच पार्श्वभुमीवर भाजपने (BJP) आज  (10  नोव्हेंबर) राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची भेट घेत सत्ता स्थापन करणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर आता काँग्रेस पक्षाकडून हालचाली वाढल्या असून पक्षाची रणनिती लवकरच ठरवली जाणार असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. राज्याला सत्ता स्थापनेच्या संकटातून वाचवण्यासाठी पक्षाच्या हायकमान सोबत बातचीत करुन त्याबाबत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी असे म्हटले आहे की, राज्याला सत्ता स्थापनेच्या संकटातून कसे काढावे यावर पुढील चर्चा करणार आहोत. आम्हाला राज्यात राजकीय संटक नको आहे. त्याचसोबत पुन्हा एकदा निवडणूक घेण्यात याव्यात हे सुद्धा नको आहे. सध्याची परिस्थिती पाहता आम्ही पक्षाची रणनिती ठरवणार आहोत. तर पक्ष जो काही निर्णय घेईल त्यामध्ये राष्ट्रवादी सुद्धा सहभागी असणार आहे.(राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महाराष्ट्रात सत्ता हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवसेनेची साथ लागणारच पण असे झाल्यास.. पहा काय म्हणतायत संजय निरुपम)

ANI Tweet:

दुसऱ्या बाजूला भाजपने सत्ता स्थापन करण्यास नकार दिला. त्यानंतर आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी कोणत्याही परिस्थितीत आमच्याच पक्षाचा मुख्यमंत्री असणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर रविवारी सकाळी सुद्धा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आमच्याच पक्षाचा मुख्यमंत्री असल्याचे जाहीर केले आहे.