Maharashtra Flood: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, पुरग्रस्त जिल्ह्यांना मिळणार मोफत राशन आणि केरोसिन

Maharashtra Flood: महाराष्ट्र मध्ये सातत्याने होणाऱ्या मुसळधार पावसामुळे काही जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच काही ठिकाणी भूस्खलन झाल्याने फार मोठे नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसात झालेल्या या पावसात खुप जणांचे बळी सुद्धा गेले आहेत. त्यामुळे हवामान खात्याकडून रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. याच दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुरग्रस्त भागाची हवाई पहाणी केली. महाराष्ट्र सरकारने पुग्रस्त भागासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. असे जाहीर करण्यात आले आहे की, पुराचा फटका बसलेल्या जिल्ह्यांना मोफत राशन आणि केरोसिन दिले जाणार आहे.(Maharashtra Rain Update: एका दिवसात पावसामुळे महाराष्ट्रात एकूण 136 जणांचा मृत्यू, विजय वडेट्टीवारांनी दिली माहिती)

महाराष्ट्राचे खाद्य पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी असे म्हटले की, पुरग्रस्त भागातील लोकांना मोफत राशन आणि केरोसिन दिले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पुरग्रस्त भागातील 6 जिल्ह्यांसाठी मोफत शिवभोजन थाळीचे दुप्पटीने प्रमाण वाढवले आहे. पुरग्रस्त जिल्ह्यांमध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश आहे. या 6 जिल्ह्यांमध्ये फार मोठे नुकसान झाले आहे. प्रत्येक परिवाराला 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ आणि 5 लीटर केरोसिन दिले जाणार आहे.(CM Uddhav Thackeray आज पूरग्रस्त महाड परिसराचा हॅलिकॉप्टर द्वारा करणार दौरा; Taliye ला देखील देणार भेट)

हवामान खात्याने असे म्हटले आहे की, महाराष्ट्रातील पश्चिम भागात शनवारी तुफान पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त अन्य राज्य जसे मध्य प्रदेश, ओडिशा, तेलंगणा, कर्नाटक किनारपट्टी, साउथ कर्नाटकसाठी IMD कडून मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर मदत आणि पुर्नवसन विभागाने असे म्हटले की,  राज्यात आलेल्या पुरपरिस्थितीमुळे  59 जण बेपत्ता झाले आहेत. तर 75 गुरांचा बळी गेला असून 90 हजार लोकांना पुरातून सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.