Coronavirus Lockdown: राज्यातील सर्व शाळांतील वर्ग सुरू होईपर्यंत पालकांना फी भरण्यास भाग पाडू नये - वर्षा गायकवाड
Education Minister Varsha Gaikwad (PC - Twitter)

महाराष्ट्र सरकारकडून (Maharashtra Government) राज्यातील सर्व शाळांना वर्ग सुरू होईपर्यंत शालेय शुल्क (Fees) न घेण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Maharashtra education minister Varsha Gaikwad) यांनी देशभरातील लॉकडाऊन (Lockdown) संपेपर्यंत शाळांनी पालकांना फी भरण्यास भाग पाडू नये, असे निर्देश दिले आहे. यासंदर्भात हिंदुस्तान टाईम्सने वृत्त दिले आहे.

हरियाणा सरकारने जारी केलेल्या परिपत्रकात हरियाणा स्कूल बोर्ड, आयसीएसई, सीबीएसई किंवा इतर कोणत्याही मंडळाशी संबंधित सर्व खासगी शाळांना वर्ग पुन्हा सुरू होईपर्यंत शालेय फी न घेण्यास सांगितले आहे. लॉकडाऊन काळात देशातील अनेक शाळांनी पालकांना फी शुल्क भरण्यास सांगितलं होतं. त्यानंतर पालकांनी यासंदर्भात सरकारकडे तक्रार केली होती. त्यानंतर सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत लॉकडाऊन काळात पालकांकडून फी न आकारण्याचे निर्देश दिले आहेत. (हेही वाचा - भारतीय लष्करामधील कर्नल रँकच्या डॉक्टरसह तीन जण कोरोना पॉझिटिव्ह; 30 मार्च 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE)

राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात आज आणखी 12 नवे रुग्ण आढळले आहेत. पुणे- 5 , मुंबई- 3, नागपूर- 2, कोल्हापूर आणि नाशिकमध्ये प्रत्येकी एक कोरोना बाधित रुग्ण आढळला आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 215 वर पोहचली आहे. तसेच देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 1 हजारहून जास्त झाली आहे.