मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 3 दिवसांचे वेतन (1 कोटी) देण्याचा निर्णय मोटार वाहन अधिकारी संघटनेने घेतला आहे. परिवहन मंत्र्यांनी याबाबत माहिती दिली. 

भारतात गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरस बाधित 227 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता नवीन माहितीनुसार, देशात कोरोना रुग्णांची संख्या 1251 वर पोहोचली आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदतीचे आवाहन करण्यात आले होते. आता मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये 2 दिवसांत 12 कोटी 50 लाख रुपये जमा झाले. 

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावात स्वतःचा जीव धोक्यात घालून, घरोघरी गॅसचा पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत काही दुर्दैवी घटना (मृत्यू) झाल्यास त्यांना मदत म्हणून 5 लाख रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांची घोषणा

मुंबईतील मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर आग लागली असून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीविषयी आणखी कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

COVID 19 मुळे मृत्यू झाल्यास कोणत्याही धर्माच्या रुग्णाच्या शवाचे दहनच होणार असे आदेश BMC आयुक्त प्रवीण परदेशी यांनी काही वेळापूर्वी दिले होते. मात्र राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आयुक्तांना निवेदन केल्यानंतर हे परिपत्रक मागे घेण्यात आले आहे.

भारताची राजधानी दिल्लीत कोरोना व्हायरस चे नवे 25 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नवी दिल्लीत कोविड-19 रुग्णांचा आकडा 97 वर जाऊन पोहोचला अशी माहिती दिल्ली आरोग्य विभागाने दिली आहे. 

मुंबई महानगर प्रदेशात कोरोना व्हायरस बाधित 47 नवे रुग्ण आढळल्याची माहिती मिळत आहे. यावरून मुंबईतील रुग्णांचा आकडा 170 गेल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने धर्माची पर्वा न  करता कोरोना बाधित सर्व मृतदेहांवर त्वरित अंत्यसंस्कार करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर अशा मृतदेहांच्या दफन विधीस परवानगी नसून अंत्यसंस्कारात 5 हून अधिक लोकांचा सहभाग असू नये असे मुंबई पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी सांगितले आहे.

कोविड-19 चे संकट लक्षात घेता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना  पंतप्रधान सहाय्यक निधीला मदत करण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने प्रत्येकी 100 रुपये पंतप्रधान सहाय्यक निधीला द्यावे असे त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे.

Load More

संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारताला देखील कोरोनाने विळखा घातला आहे. देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1024 वर पोहचली आहे. तसेच आतापर्यंत 96 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. परंतु, या जीवघेण्या विषाणुमुळे आतापर्यंत देशात 27 जणांचा बळी गेला आहे. आरोग्यमंत्रालयाकडून रविवारी यांसदर्भात आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.

याशिवाय अमेरिका आणि युरोपमध्ये कोरोना विषाणुने अनेकांचा बळी घेतला आहे. जगभरातील कोरोनाबधितांची संख्या 7 लाखाहून अधिक झाली असून मृतांचा आकडा 34 हजारांवर पोहोचला आहे. अमेरिकेत रविवारी एका दिवसात 18 हजार नवे रुग्ण आढळले आहेत. तसेच आतापर्यंत अमेरिकेत 2475 जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी अमेरिकेत एका दिवसात 255 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय इटलीमध्ये कोरोनामुळे 10 हजार 700 हुन अधिक लोकांना आपला जीव गमावला आहे. स्पेनमध्ये रविवारी एका दिवसात 821 जणांचा कोरोनामुळे बळी गेला.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

दरम्यान, शिवसेनेच्या आजच्या आग्रलेखात भाजपा गांभीर्य नसलेला पक्ष असून दंडुका पडल्याशिवाय भाजपचं डोकं ठिकाणावर येणार नाही, अशी टीका करण्यात आली आहे. लॉकडाउनच्या परिस्थितीत विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या लोकांना पोलिसांच्या काठीचा मार खावा लागत आहेत. यावर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली होती. त्यामुळे शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखात भाजपवर निशाणा साधला आहे. एका व्यक्तीच्या चुकीमुळे शंभरजणांना, त्या शंभरांतून पुढच्या हजारांना कोरोना बाधणार असेल तर त्या एका व्यक्तीच्या पार्श्वभागावर दंडुका हाणणे ही समाजसेवा आणि आरोग्यसेवाच आहे. पोलिसांना दंडुका का वापरावा लागतो, याचा विचार प्रमुख विरोधी पक्षाने करायला हवा, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.