महाराष्ट्रात मागील एका आठवड्यापासून ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी सरकारी धोरणे अक्षरशः कोलमडून पडत आहेत. यामुळे साधारण सर्वच स्तरातून सरकारवर टीका केली जात आहे. अशातच महाराष्ट्र काँग्रेसचे नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह सर्व मंत्र्यांवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावी अशी मागणी केली आहे. राज्यात पुरामुळे झालेल्या दुर्दशेसाठी फडणवीस सरकार जबाबदार आहे त्यांनी या परिस्थितीकडे दुर्लक्ष केले असं म्हणत पटोले यांनी या सरकारवर 2005 चा आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management Act 2005) कायद्याचा भंग केल्याचा आरोप लगावला आहे. तसेच यासाठी मंत्रिमंडळींना कायद्याच्या चौकटीत उभं करण्यात यावं अशीही मागणी केली आहे. Maharashtra Monsoon & Flood 2019 Live Updates: महाराष्ट्रात पूर संकटामुळे MPSC ची परीक्षा दोन आठवडे पुढे ढकलली, परीक्षार्थींना दिलासा
ANI ट्विट
Maharashtra Congress leader Nana Patole demands FIR against Chief Minister & other ministers under Maharashtra Disaster Management law of 2005, for negligence In tackling the disaster situation in Maharashtra. pic.twitter.com/uoElwFukkX
— ANI (@ANI) August 9, 2019
दरम्यान, राज्यात पुरामुळे सामान्य नागरिक पूर्णतः हवालदिल झाले आहेत. कोल्हापूर, सांगली, पुणे, सातारा, नाशिक सह अन्य अनेक ठिकाणी पावसामुळे एकच हाहाकार माजला आहे. यावेळी अनेक नेते मंडळी पूरग्रस्त परिसरात भेट देऊन पाहणी करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा काल हेलिकॉप्टर मधून संबधित परिसराची पाहणी केली.पुरात अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी हवाई व रस्ते मार्गाने शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. एनडीआरएफ, नौदल, सैन्यदल यांच्यासह सामान्य नागरिकही एकमेकांना या पुराचं संकटापासून वाचवण्यासाठी युद्धपातळीवर कार्यरत आहेत.