महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: मलकापूर विधानसभा संघामध्ये बंडखोरी करणारे माजिद कुरैशी कॉंग्रेस पक्षातून बडतर्फ
Maharashtra Congress (Photo Credits: File Photo)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 चा प्रचार सध्या राज्यभर जोरात सुरू झाला आहे. राज्यात 21 ऑक्टोबर दिवशी विधानसभा निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. मात्र अजूनही अनेक पक्षांना बंडखोर उमेदवारांचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्षाने मलकापूर विधानसभा मतदार संघातून (Malkapur Constituency) अधिकृत उमेदवारा विरूद्ध बंडखोरी करणार्‍या माजिद कुरैशी (Majeed Qureshi) यांना बडतर्फ केले आहे. मलकापूर विधानसभा संघातून कॉंग्रेस पक्षाने राजेश एकडे (Rajesh Ekade) यांना अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केले आहे.

मलकापूर हा बुलढाणा जिल्ह्यातील मतदार संघ आहे. या विधानसभा मतदार संघावर भाजपचं वर्चस्व आहे. 1995 सालापासून या विधानसभा मतदार संघामध्ये भाजपाचे चैनसुख संचेती निवडून आले आहे. कॉंग्रेसला या मतदार संघात केवळ दोनदा विजय मिळवता आला आहे. दरम्यान यंदा कॉंग्रेसने राजेश एकडे यांच्या रुपाने नवा चेहरा निवडणूक रिंगणात उतरवला आहे.

ANI Tweet 

महाराष्ट्रात कॉंग्रेसच्या प्रचारासाठी कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधी 13 ऑक्टोबर पासून येणार आहेत. 13 आणि 15 ऑक्टोबरला राहुल गांधी महाराष्ट्रात प्रचार सभा घेणार आहेत. राज्यात 288 विधानसभा मतदारसंघात एकाच वेळेस 21 ऑक्टोबरला निवडणूक मतदान पार पडेल तर 24 ऑक्टोबर मत मोजणी पार पडणार आहे.