गेल्या काही दिवसांपासून लता मंगेशकर यांची तब्येत थोडी नाजूक आहे. सध्या त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहे. अशात उद्धव ठाकरे यांनी रुग्णालयात लता मंगेशकर यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली.
Maha Vikas Aghadi Sarkar Live Updates: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली लता मंगेशकर यांची भेट; केली तब्यतेची चौकशी
Maha Vikas Aghadi Sarkar Live Updates: 'मी.. उद्धव बाळासाहेब ठाकरे...शपथ घेतो की..' हे शब्द गुरुवारी (28 नोव्हेंबर 2019) सायंकाळी 6 वा 40 मिनिटांनी मुंबई येथील शिवाजी पार्क (शिवतिर्थ) मैदानावर घुमले आणि राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाविकासआघाडी सरकार सत्तेवर आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत महाविकासआघाडीतील एकूण सहा मंत्र्यांनी मंत्रिपद आणि गोपनियतेची शपथ घेतली. यात शिवसेनेच्या वतीने एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून, छगन भुजबळ आणि जयंत पाटील तर, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून बाळासाहेब थोरात, नितीन राऊत या मंत्र्यांनी शपथ घेतली. या शपथविधीस देशभरातील विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राजकीय नेते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. शपथविधी पार पडल्यानंतर महाविकासआघाडी सरकारची पहिली मंत्रिमंडळ बैठक पार पडली. आज (शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019) या सरकारचा पहिलाच दिवस असून, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून दुपारी एक वाजता पदभार स्वीकारणार आहेत. या पदभारासोबत राज्यात घडणाऱ्या राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठीसोबत जोडलेले राहा.
महाविकासआघाडी सरकारकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणूक 2019 नंतर देशभरात भारतीय जनता पक्षाचा विजयरथ चौफेर दवडताना पाहायला मिळाला. लोकसभा निवडणूक 2014 नंतर देशभरात झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये या विजयाचा प्रभाव पाहायला मिळाला. लोकसभा निडणूक 2019 आणि विविध राज्यांमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणूक 2019 मध्येही भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांचीच सरशी झाली. नाही म्हणायला अपवाद म्हणून राजस्थान, मध्य प्रदेश आदी राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाला पूर्ण बहुमताने सत्ता मिळाली. पण, काही राज्यांमध्ये प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरुनही काँग्रेस आणि संपुआला विरोधी पक्षात बसावे लागले. भाजपच्या आक्रमक राजकारणामुले काँग्रेस आणि संपुआची मोठी पिछेहाट झाली. महाराष्ट्र मात्र याला अपवाद ठरला. (हेही वाचा, Maharashtra Government Formation: बहुमत चाचणी नंतर अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद?)
महाराष्ट्रात शरद पवार यांचे राजकीय कसब कामी आले आणि भाजपच्या आक्रमक राजकारणाला पायबंध बसला. विशेष म्हणजे राज्यात काँग्रेस नेस्तनाबूत होण्याच्या मार्गावर असताना आणि विधानसभा निवडणुकीत सत्ताबाजारात सर्वात छोटा पक्ष ठरलेल्या काँग्रेसला सत्तेत सहभागी होण्याची संधी मिळाली. देशभराती राजकीय वर्तुळासाठी हा मोठा आश्चर्यकारक क्षण होता. पण, असे घडले खरे. त्यामुळे या सरकारकडे देशाचे लक्ष लागले आहे.