महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद (Maharashtra- Karnataka Border Dispute) प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची ( High Power Committee) एक बैठक पार पडत आहे. या बैठकीस मुख्यमंत्र्यांसह शरद पवार, छगन भुजबळ यांच्यासह आणखी काही नेते उपस्थित राहणार आहेत. बेळगाव महापालिकेसमोर असलेला ध्वज उतरवून कन्नड रक्षक वेदिका या संघटनेने दुसराच कोणतातरी झेंडा फडकवल्याने सीमाभागात मोठा तणाव निर्माण झाला होता.
महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद गेली अनेक वर्षे कायम आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक अशी दोन्ही राज्ये आपापल्या मुद्द्यांवर ठाम आहेत. त्यामुळे हा वाद विकोपाला गेला आहे. त्यातून मराठी आणि कन्नड भाषिक यांच्यात स्थानिक पातळीवर आणि पुढे राज्य प्रादेशिक पातवळीवर वाद निर्माण झाल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. सद्यास्थितीत हा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालय या वादावर काय प्रतिक्रिया देते यावर बरेच काही अवलंबून असणार आहे. परंतू, तोवर दोन्ही राज्यांमधील राजकीय संघटना आक्रमक झालेल्या पाहायाला मिळतात. (हे देखील वाचा- Belgaum Dispute: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रकरणी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांचे मोठे विधान; 'महाराष्ट्राला एक इंच जमीन देणार नाही')
बेळगावमध्ये कन्नड रक्षक वेदिका संघटनेने बेळगाव महापालिकेसमोर वेगळा झेंडा लावल्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. कोल्हापूरातील आक्रमक शिवसैनिकांनी बेळगावमध्ये जाऊन आगोदर होता तोच झेंडा फडकावण्याचा निर्धार केला. या वेळी कर्नाटक पोलिस आणि शिवसैनिक आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर कर्नाटक हद्दीत गणिमी काव्याने प्रवेश करत शिवसैनिकांनी झेंडा फडकावल्याचे पाहायला मिळाले.
Maharashtra CM Uddhav Thackeray (file photo) to chair a meeting of High Power Committee constituted for the border dispute with Karnataka. pic.twitter.com/qqDNN1rfOQ
— ANI (@ANI) January 27, 2021
दुसऱ्या बाजूला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्यातही सामना पाहायला मिळाला. महाराष्ट्राची एक इंचही जमीन कर्नाटकला देणार नाही अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली. त्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी केवळ राजकारणासाठी अशी वक्तव्ये करणे सोडून द्यावे. घटनेनुसार सर्व नागरिक एक आहेत अशी भूमिका घेत दोन्ही राज्यांमध्ये वाद, संघर्ष निर्माण होणार नाही हे पाहावे, असे येडीयुरप्पा यांनी म्हटले होते.