CM Uddhav Thackeray Address Today: महाराष्ट्रात (Maharashtra) कोरानाची (Coronavirus) दुसरी लाट ओसरल्याने राज्यातील काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, ज्या भागात रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे, त्या ठिकाणी कोरोनाचे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत, असे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले होते. याचपाश्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आज रात्री आठ वाजता राज्यातील जनतेला संबोधित करणार आहेत. यावेळी निर्बंध शिथिल करण्याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज (8 ऑगस्ट) रात्री 8 वाजता सोशल मीडियावरून राज्यातील जनतेला संबोधित करणार आहेत. राज्यातील रुग्णसंख्येत दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे. याचपार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय घोषणा करणार आहेत? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आलेली मुंबईची लाईफलाईन लोकल सेवा दोन्ही लस घेतलेल्या नागरिकांसाठी सुरू करण्याची शक्यता आहे. याचबरोबर मुंबईतील मॉल देखील पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. याशिवाय, कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे, अशा भागातील रेस्टॉरंट, बारच्या सुरु ठेवण्याच्या वेळेत वाढ केली जाऊ शकते. हे देखील वाचा- Mumbai Local Update: सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास खुला होणार? उद्या टास्क फोर्सची महत्त्वपूर्ण बैठक
राज्य सरकारने गेल्या आठवड्यात जाहीर केलेल्या नव्या नियमावलीनुसार, ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी आहे, तेथे दुकाने रात्री 8 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये कोरोनाची स्थिती चिंताजनक आहे. यामुळे या जिल्ह्यातील निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.