CM Uddhav Thackeray Live Streaming: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी साधणार संवाद; येथे पाहा लाईव्ह

महाराष्ट्रात (Maharashtra) आलेल्या कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेचा राज्यातील नागरिकांना मोठा फटका बसला आहे. ज्यामुळे राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. दरम्यान, कोरोना रुग्णांच्या संख्येत झालेली घट पाहता राज्यातील जवळपास 25 जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले होते. मात्र, ज्या भागात रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे, त्या ठिकाणी कोरोनाचे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. याचपार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray Live) आज रात्री जनतेशी संवाद साधणार आहेत. यामुळे उद्धव ठाकरे आज नेमकी काय घोषणा करतात? याकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण पाहण्यासाठी खाली लिंक देण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8 वाजता फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. रेस्टॉरंट आणि सर्वसामान्यांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्याबाबत पुढील आठवड्यात आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल, असे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यामुळे आज कोणते नियम शिथिल केले जाणार? याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागून आहे. हे देखील वाचा-Pune Unlock: उद्यापासून पुणे अनलॉक! महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती; कशा-कशातून मिळाली सूट? घ्या जाणून

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लाईव्ह-

 

 

महाराष्ट्रात काल (7 ऑगस्ट) 6 हजार 61 नवे रुग्ण आढळून आले होते. तर, 187 मृत्युची नोंद झाली होती. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 4 कोटी 93 लाख 72 हजार 212 वर पोहचली आहे. यापैकी 61 लाख 39 हजार 493 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, 1 लाख 33 हजार 845 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 71 हजार 50 रुग्ण सक्रीय आहेत.