MSBSHSE Class 12th Result 2021: बारावीच्या विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता; mahresult.nic.in वर असा पहा ऑनलाईन निकाल
Results | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

MSBSHSE Class 12 result 2021: सीबीएससी ने आज दहावीचा निकाल जाहीर केल्यानंतर आता महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे लक्ष बारावी निकालाकडे लागले आहे. आज महाराष्ट्र बोर्ड अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने लावलेला बारावीचा निकाल जाहीर करणार आहेत. दुपारी 4 वाजता हा निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. यंदा पहिल्यांदाच परीक्षेविना केवळ अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने निकाल जाहीर होत असल्याने सार्‍यांचे लक्ष त्याकडे लागले आहे. CBSE किंवा ICSE प्रमाणे आज बारावीचा निकाल देखील 30:30:40 या फॉर्म्युलाने जाहीर होईल. त्यामध्ये 10वी आणि 11वीच्या गुणांना प्रत्येकी 30% आणि 12वीच्या अंतर्गत मूल्यमापनाला 40% गुण देऊन राज्य शिक्षण मंडळ देखील यंदा 12वीचा निकाल जाहीर करत आहे. काही वेळापूर्वीच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांसाठी आज संध्याकाळी 4 वाजता निकाल कसा पहाल याचे स्टेप बाय स्टेप गाईड ट्वीट करत माहिती दिली आहे. Maharashtra HSC Result 2021: आज बारावीचा निकाल पाहण्यासाठी तुमचा Class 12 Roll Number हा mh-hsc.ac.in वर कसा पहाल?

कसा पहाल आज 12वी चा निकाल?

  • अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  • HSC results 2021’ चं नवं पेज ओपन होईल.
  • नव्या विंडो वर तुम्हांला विचारलेली माहिती भरा. यामध्ये रोल नंबर आणि आईचं नाव विचारलं जाईल.
  • आता तुम्हांला निकाल  विषय निहाय पाहता येईल.
  • हा निकाल सेव्ह करून ठेवा.

वर्षा गायकवाड ट्वीट

यंदा महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षेला अंदाजे 14-16 लाख विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन झाले आहे. मार्च महिन्यात राज्यात कोविड-19 ची दुसरी लाट थैमान घालत असल्याने बोर्डाने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि आता हा परीक्षेविना अंतर्गत मूल्यमापनाने निकाल लावला जात आहे. आज दुपारी 4 वाजता विद्यार्थी त्यांचा अंतिम निकाल पाहू शकणार आहेत.