HSC Result 2021 | PC: mh-hsc.ac.in

Seat/ Roll Number Finder For HSC Students:  महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून अर्थात MSBSHSE आज दुपारी 4 वाजता बारावीचा निकाल विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन खुला करणार आहे. यंदा बोर्ड परीक्षेविना अंतर्गत मूल्यमापनातून बारावीचा निकाल पहिल्यांदाच जाहीर होणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना त्यांचं अ‍ॅडमीड कार्ड न मिळाल्याने रोल नंबरच ठाऊक नाही अशांना त्रास होऊ नये म्हणून बोर्डाने विशेष खबरदारी घेतली आहे. बोर्डाने mh-hsc.ac.in या त्यांच्या संकेतस्थळावर 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी Class 12 Roll Number Finder जारी केला आहे. यामध्ये तुम्ही निकालाआधी तुमचा रोल नंबर एकदा पडताळून पहा किंवा तुम्हांला रोल नंबर ठाऊकच नसेल तर तो जाणून घेऊ शकता. Maharashtra Board 12th Result 2021: बारावीचा निकाल जाहीर; msbshse.co.in वर ऑनलाईन निकाल असा पहा स्टेप बाय स्टेप!

12वीचा निकाल यंदा 10वी आणि 11वीचे मार्क्स प्रत्येकी 30% आणि 12वीचे अंतर्गत मूल्यमापनाचे मार्क्स 40% या फॉर्म्युलाने लावला जाणार आहे. इतर बोर्डांनी देखील याच फॉर्म्युलाने यंदा निकाल जाहीर केलेला आहे. मग तुमचं अ‍ॅडमीट कार्ड नसेल, हरवले असेल तर निकाल पाहण्यासाठी रोल नंबर महत्त्वाचा असल्याने HSC Roll Number/ Seat number इथे काही महत्त्वाचे अपडेट्स शेअर करून नक्की पाहून ठेवा म्हणजे 4 वाजता तुम्हांला पटकन निकाल पाहता येणार आहे.

MSBSHSE चे विद्यार्थी त्यांचा Roll Number/ Seat number कसा पाहू शकतात?

  • mh-hsc.ac.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  • नव्या विंडो मध्ये तुम्हांला तालुका, जिल्हा आणि तुमचं नावं (दिलेल्या फॉर्मेट मध्ये) एंटर करायचं आहे.
  • तुमचे तपशील आवेदनपत्रामध्ये नमूद केल्याप्रमाणे जुळले तर तुमचा रोल नंबर स्क्रिन वर दिसणार आहे.

(नक्की वाचा: Maharashtra Board 12th Result 2021: आज जाहीर होणार बारावीचा निकाल; mahahsscboard.in सह या संकेतस्थळांवर पहा ऑनलाईन गुण!).

यंदा महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षेला अंदाजे 14-16 लाख विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन झाले आहे. मार्च महिन्यात राज्यात कोविड-19 ची दुसरी लाट थैमान घालत असल्याने बोर्डाने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि आता हा परीक्षेविना अंतर्गत मूल्यमापनाने निकाल लावला जात आहे. आज दुपारी 4 वाजता विद्यार्थी त्यांचा अंतिम निकाल पाहू शकणार आहेत.