Maharashtra Board 12th Result 2021: आज जाहीर होणार बारावीचा निकाल; mahahsscboard.in सह या संकेतस्थळांवर पहा ऑनलाईन गुण!
Representational Image (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या 12वीच्या विद्यार्थ्यांची निकालाची (Maharashtra Board HSC Result) प्रतिक्षा अखेर संपली आहे. आज MSBSHSE कडून दुपारी 4 वाजता विद्यार्थ्यांना त्यांचे मार्क्स ऑनलाईन पाहता येणार आहेत. यंदा कोरोना संकटामुळे इतर बोर्डांप्रमाणे महाराष्ट्रातही बारावीची परीक्षा रद्द झाल्याने आजचा निकाल हा अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे पालक, विद्यार्थ्यांमध्ये या निकालाबाबत कमालीची उत्सुकता आहे. दरम्यान बोर्डाची अधिकृत वेबसाईट mahahsscboard.in किंवा maharashtraeducation.com व्यतिरिक्त देखील काही थर्ड पार्टी वेबसाईटसच्या मदतीने विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे त्यामुळे आज सकाळी बोर्डाने निकालाचा अहवाल स्पष्ट केल्यानंतर दुपारी 4 वाजता विद्यार्थी गुण पाहू शकतील.

CBSE किंवा ICSE प्रमाणे आज बारावीचा निकाल देखील 30:30:40 या फॉर्म्युलाने जाहीर होईल. त्यामध्ये 10वी आणि 11वीच्या गुणांना प्रत्येकी 30% आणि 12वीच्या अंतर्गत मूल्यमापनाला 40% गुण देऊन राज्य शिक्षण मंडळ देखील यंदा 12वीचा निकाल जाहीर करत आहे.

बारावीचा ऑनलाईन निकाल कुठे पहाल?

दहावीचा निकाल पाहताना सर्व्हर डाऊन झाल्याने विद्यार्थी आणि पालकांचा संताप पाहता यंदा बोर्डाने अधिक खबरदारी घेतली आहे. एकापेक्षा अधिक वेबसाईट्सवर यावेळेस 12वीच्या विद्यार्थ्यांना त्यांचे गुण पाहता येणार आहेत.

 • https://hscresult.11thadmission.org.in
 •   https://msbshse.co.in
 • hscresult.mkcl.org
 • mahresult.nic.in.
 • https://lokmat.news18.com
 • www.mahresult.nic.in
 • https://msbshse.co.in

31 जुलैला विद्यार्थ्यांसाठी बोर्डाने त्यांचे रोल नंबर्स देखील जारी केले आहेत. निकालापूर्वी येथे तुम्ही रोल नंबर पाहू शकता.

कसा पहाल निकाल?

 • अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
 • ‘Maharashtra Class 12 results 2021’ या लिंक वर क्लिक करा.
 • नव्या विंडो वर तुम्हांला विचारलेली माहिती भरा.
 • तुम्हांला निकाल पाहता येईल.
 • हा निकाल सेव्ह करून ठेवा.

यंदा महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून 9 विभागीय मंडळातून सुमारे 14 लाख विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन झाले आहे. या विद्यार्थ्यांना आज निकालाची प्रतिक्षा आहे. काही दिवसांपूर्वी दहावीचा निकाल जाहीर झाला असून तो 99.96% लागला आहे.