Maharashtra HSC Result 2021: बोर्डाकडून बारावी विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक जारी; कसा पाहाला तुमचा सीट नंबर? जाणून घ्या सोप्या स्टेप्स
Representational Image (Photo Credits: File Photo)

दहावी  (SSC) बोर्डाच्या निकालानंतर आता बारावीचे (HSC) विद्यार्थी निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून लवकरच बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. तत्पूर्वी परीक्षा मंडळाकडून विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक जारी करण्यात आले आहेत. http://mh-hsc.ac.in या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना आपला सीट नंबर पाहता येईल. त्यासाठी काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. त्याबद्दल जाणून घेऊया... (COVID-19 च्या पार्श्वभूमीवर पहिली ते बारावीच्या यंदाच्या अभ्यासक्रमातही 25% कपात; मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती)

आपला बैठक क्रमांक कसा पाहाल?

# http://mh-hsc.ac.in या वेबसाईटला भेट द्या.

# त्यानंतर तुमचा जिल्हा आणि तालुका निवडा.

# तुमचे संपूर्ण नाव, आडनाव, वडिलांचं नाव नमूद करा.

# सब्मिट केल्यानंतर स्किनवर तुमचा सीट नंबर तुम्हाला पाहता येईल.

कोविड-19 संकटामुळे यंदा बारावी बोर्डाची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे अंतर्गत मुल्यमापन पद्धतीने विद्यार्थ्यांना गुण देण्यात येणार आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार 31 जुलैपर्यंत निकाल जाहीर होणं गरजेचं होतं. मात्र राज्यात झालेली अतिवृष्टी, पूरपरिस्थिती यानुसार निकाल ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल, असा अंदाज आहे. 

बारावीच्या निकालात दहावी, अकारावी आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ग्राह्य ठरले जाणार आहेत. यात दहावीसाठी 30 टक्के, अकरावी साठी 30 टक्के आणि बारावी साठी 40 टक्के अशी विभागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, यंदा 10 वीचा निकाल देखील अंतर्गत मुल्यमापन पद्धतीने जाहीर करण्यात आला. यंदाचा दहावीचा निकाल 16 जुलै जाहीर झाला असून राज्याचा निकाल 99.96% इतका लागला आहे. मात्र अकारावी प्रवेशासाठी वैकल्पिक सीईटी घेण्यात येणार आहे.