महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे वाढदिवसा दिवशी प्लाझ्मा दान
Jitendra Awhad (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आज (5 ऑगस्ट) त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून प्लाझ्मा दान केले आहे. दरम्यान ठाणे येथील ब्लड लाईन रक्तपेढी मध्ये त्यांनी हे प्लाझ्मा डोनेशन केले आहे. एप्रिल महिन्यात जितेंद्र आव्हाड यांना कोरोना व्हायरसची लागण झाली होती. त्यानंतर काही काळ त्यांची प्रकृती चिंताग्रस्त होती. मात्र 10 मे दिवशी त्यांनी कोरोनावर मात करून लढाई जिंकली. आता कोरोनामुक्त झालेल्या जितेंद्र आव्हाड यांनी कोविड 19 च्या इतर रूग्णांना जीवनदान देण्यासाठी प्लाझ्मा दान केले आहे. Plasma Therapy: कोरोना मुक्त झाल्यावर किती दिवसांनी करता येणार प्लाझ्मा दान, जाणून घ्या

सध्या जगभरात कुठेच कोरोना व्हायरस विरूद्ध ठोस लस मिळालेली नाही. अशावेळेस अतिगंभीर रूग्णांना वाचवण्यासाठी प्लाझ्मा चढवला जात आहे. यामध्ये कोरोनामधून ठीक होऊन परतलेल्या रूग्णांच्या शरीरातील रक्ताच्या नमुन्यातून प्लाझ्मा वेगळा केला जातो. ठीक झालेल्या रूग्णाच्या शरीरातील अ‍ॅन्टीबॉन्डीज अत्यावस्थ रूग्णाच्या शरीरात इंजेक्ट केल्याने त्यांची रोगप्रतिकारशक्ती सुधारते. परिणामी कोरोना व्हायरसचा धोका कमी होतो.

जितेंद्र आव्हाड यांचे प्लाझ्मा दान

 

महाराष्ट्रामध्ये Coronavirus रुग्णांना प्लाझ्मा थेरपी देण्यासाठी ‘प्रोजेक्ट प्लॅटिना’ ची सुरुवात काही दिवसांपूर्वी झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जगातील सर्वात मोठ्या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले होते.

महाराष्ट्रामध्ये आता हळूहळू कोरोनावर नियंत्रण मिळवण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना यश मिळताना दिसत आहे. मुंबई, पुणे, ठाणे मध्ये सर्वाधिक कोरोना रूग्ण आहेत. मात्र आता झपाट्याने कोरोनाचे अ‍ॅक्टिव्ह रूग्ण कमी होत असल्याने आरोग्य यंत्रणेसाठी ही मोठी दिलासादायक बाब आहे.