Chief Minister Uddhav Thackeray's (PC - Twitter)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या (Coronavirus In Maharashtra)  रुग्णांची आकडे वाढत असताना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते एका आश्वासक उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. कालच्या लाईव्ह सेशन मध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितल्या प्रमाणे आज ‘प्रोजेक्ट प्लॅटिना’ (Project Platina) या प्लाझ्मा थेरपी (Plasma Therapy) उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले आहे.प्रोजेक्ट प्लॅटिना हा प्लाझ्मा थेरपीचा जगातील सर्वात मोठा प्रकल्प असणार आहे.सध्या तरी कोरोना व्हायरस रुग्णांसाठी हा प्रकल्प राबवला जाणार आहे. प्राप्त माहितीनुसार, या प्रकल्पासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतुन 16.65 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून अवघ्या 21 दिवसात हे काम पूर्ण करण्यात आले. Coronavirus Update: राज्यात कोणत्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत? पहा महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी

कालच्या लाईव्ह सेशन मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्लाझ्मा थेरपी बाबत भाष्य केले होते. मार्च एप्रिल पासून शक्य तितक्या प्रमाणात प्लास्मा थेरपीचा वापर करत आहोत, आपण जगातील सर्व देशांच्या तुलनेत बरोबरीने आहोत कुठंही मागे पडलेलो नाही. आपण सुविधा निर्माण केल्या आहेत आता कोरोनावर मात केलेल्या रुग्णांनी सुद्धा प्लास्मा डोनेशन करायला हवे जेणेकरून या चाचण्या करता येतील. अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी जनतेला आवाहन केले होते.

CMO महाराष्ट्र ट्विट

दरम्यान, महाराष्ट्रात मागील तीन दिवसांपासून 5  हजारांवर रुग्ण संख्या वाढत आहे, आतापर्यंत राज्यात एकूण 164626 कोरोनाबाधित आढळले आहेत. यापैकी 86575 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 70607 ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत तर 7429 जणांनी आपले प्राण गमावले आहेत.