Coronavirus Update: राज्यात कोणत्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत? पहा महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी
प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

Coronavirus Updates In Maharashtra: महाराष्ट्रात काल, रविवार 28 जून रोजी सलग चौथ्या दिवशी कोरोनाबाधितांच्या संख्येत 5  हजाराहून अधिक रुग्णांची वाढ झाली आहे. कालच्या आकडेवारीनुसार, राज्यात 5493 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली असून 156 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधीत रुग्णांची संख्या आता 164626 अशी झाली आहे. तर कालच्या दिवसभरात 2330 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 86575 रुग्ण बरे होऊन डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या राज्यात एकूण 70607 ऍक्टिव्ह रुग्ण असून आजवर तब्बल 7429जणांनी आपले प्राण गमावले आहेत. महाराष्ट्रात मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर या भागात अजूनही कोरोनाचे रुग्ण आहेत, या व अन्य जिल्ह्यात किती कोरोनाबाधित आहेत हे जाणून घेण्यासाठी खालील तक्ता तपासून पहा. Coronavirus In Dharavi: धारावीत आज 13 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

 आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा रेट आता 52.59 टक्के एवढा झाला आहे. तर मृत्युदर कमी होऊन अवघ्या 4.51 टक्के वर पोहचला आहे. Uddhav Thackeray Live Updates: 30 जून नंतर महाराष्ट्रात काय होणार? Plasma केंद्रांची निर्मिती ते Lockdown संदर्भात उद्धव ठाकरे यांनी काय सांगितले जाणुन घ्या

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी

जिल्हा संक्रमित रुग्ण मृत्यू बरे झालेले रुग्ण
मुंबई 75,539 4371 43,154
ठाणे 34,257 845 14,335
पुणे 20,870 714 10,708
पालघर 5267 101 1767
औरंगाबाद 4833 227 2222
नाशिक 3902 217 2063
रायगड 3669 95 1924
जळगाव 3002 220 1793
नागपुर 1421 14 1037
अकोला 1463 73 869
सातारा 1004 43 703
सोलापुर 2588 246 1430
कोल्हापुर 824 10 710
रत्नागिरी 569 26 423
धुळे 962 54 449
अमरावती 528 24 368
जालना 488 14 313
सांगली 347 11 201
नांदेड 337 13 231
अहमदनगर 399 14 249
हिंगोली 262 1 238
यवतमाळ 283 10 186
लातुर 303 17 191
उस्मानाबाद 203 9 161
सिंधुदुर्ग 204 4 151
बुलडाणा 213 12 140
गोंदिया 105 1 102
बीड 112 3 77
परभणी 92 4 75
नंदुरबार 166 7 70
भंडारा 79 0 58
वाशिम 101 3 61
गडचिरोली 64 1 51
चंद्रपुर 80 0 54
वर्धा 16 1 11
अन्य जिल्हे 74 23 0
एकुण 1,64,626  7,429  86,575 

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच्या लाईव्ह सेशन मध्ये दिलेल्या माहितीनुसार, राज्यात कोरोनाबाधितांच्या उपचारांसाठी वैद्यकीय कर्मचारी सज्ज आहेत, आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या औषधांची चर्चा होतेय त्या सर्वांचा साठा आपल्याकडे असून त्याचा वापर केला जातोय. तसेच आजपासून राज्यात प्लाज्मा थेरपी साठी असणारी केंद्र वाढवण्याच्या कामाला सुद्धा सुरुवात होणार आहे.