Uddhav Thackeray Live Updates: 30 जून नंतर महाराष्ट्रात काय होणार? Plasma केंद्रांची निर्मिती ते Lockdown संदर्भात उद्धव ठाकरे यांनी काय सांगितले जाणुन घ्या
Chief Minister Uddhav Thackeray | (Photo Credits- Facebook )

CM Uddhav Thackeray Live: महाराष्ट्रात 30 जून पर्यंत लॉकडाऊन (Lockdown In Maharashtra) आहे  पण त्यानंतर साठी काय प्लॅनिंग आहे याबाबत सर्वांना प्रश्न पडला  होता. यावर आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी लाईव्ह सेशन मधून उत्तर दिले आहे. 30 जून नंतर लॉक डाऊन संपणार नाही हे निश्चित आहे, मात्र लॉकडाऊन हा शब्द बाजूला ठेवून आता हळूहळू सर्व सुरु करायचं आहे. आपण अनेक उद्योग, व्यवसाय, खाजगी कार्यलये आपण सुरु करत आहोत, मिशन बिगिन अगेन असलं तरीही संकट टळलेल नाही त्यामुळे बेसावध राहू नका. अनावश्यक कारणांसाठी बाहेर पडू नका असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना केले आहे. लॉकडाऊन करायचा की नाही हा प्रश्न तुमच्यावर आहे. जर का तुम्ही गर्दी केली आणि व्हायरस वाढला तर पुन्हा लॉक डाऊन लागू करण्यावाचून पर्याय नाही असा इशाराही उद्धव यांनी केला आहे. याशिवाय उद्धव ठाकरे यांनी शेतकरी समस्या (Farmers Issue) , येत्या काळातील सण (Festivals), प्लास्मा थेरपी (Plasma Theropy)  या सर्व बाबतीत भाष्य केले आहे. या भाषणातील महतवाचे मुद्दे जाणून घ्या.

प्लास्मा थेरपी

मार्च एप्रिल पासून शक्य तितक्या प्रमाणात प्लास्मा थेरपीचा वापर करत आहोत, उद्या पासून या केंद्रांची संख्या वाढवणार आहोत असे सांगताना आपण जगातील सर्व देशांच्या तुलनेत बरोबरीने आहोत कुठंही मागे पडलेलो नाही असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. या केंद्रांसाठी प्लास्मा डोनेशन करायला हवे ज्यांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे त्यांनी पुढे येऊन हे रक्त/प्लास्मा दानकरावे अशी विनंती सुद्धा ठाकरे यांनी केली आहे. या केंद्रां सहित महाराष्ट्र हा भारतातील सर्वात अधिक प्रमाणात प्लास्मा थेरपी वापरणारे राज्य ठरू शकतो असेही ठाकरे म्हणाले.

तसेच आपण सध्या बाजारात कोरोना उपचारात वापरली जाणारी सर्व औषधे वापरत आहोत, मात्र त्यासाठी केंद्र सरकारची परवानगी आवश्यक असते, गेल्या आठवड्यात Remdesivir, Favipiravir या औषधांच्या वापराची परवानगी मिळाली आहे आता त्यांचा साठा उपलब्ध करून हळूहळू मोफत पुरवठा करणार आहोत.

शेतकऱ्यांना आधार

बोगस बियाण्यांची समस्या हे दुर्दैव आहे. मागील काही काळात अनेक ठिकाणी हा प्रकार घडून आला आहे, अर्थात यामुळे शेतकरी बांधवांवर संकट ओढवले आहे, मात्र ज्यांनी हा प्रकार केला आहे त्यांचा तपास करून त्यांच्याकडूनच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई करून देणार असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.

आषाढी एकादशी सहित सणांवर भाष्य

सर्व परंपरा पालन करताना कोणत्याही धर्मियांनी नियम मोडलेले नाहीत यासाठी उद्धव ठाकरे यांनी आभार मानले आहेत. 1 जुलै ला असणाऱ्या आषाढी एकादशीला सर्व वारकऱ्यांच्या वतीने पंढरपूर ला जाऊन विठुरायाला साकड घालणार आहे,  असेही  ते म्हणाले. दहीहंडी मंडळांनी भान राखून स्वतः यंदाचा उत्सव रद्द केला, गणेशोत्सव मंडळांनी सुद्धा साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काळात बाकीचे उत्सव सुद्धा समस्या लक्षात घेऊन आपण साजरे करायचे आहेत.

महाराष्ट्रात व्यवसायिक गुंतवणूक

महाराष्ट्रात मागील काही काळात 16 हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे. आपण कोरोनाचे संकट घेऊन रडत बसून राहणार नाही आहोत गुंतवणूकदारांना आमंत्रण आहेच, त्यांना राज्यात सहकार्य केले जाईल, भूमिपुत्रांना घेऊन या व्यवसायांना पुढे जाण्यासाठी प्रयत्न केला जाईल.

दरम्यान, येत्या काळात कोरोना रुग्णांची संख्या वाढू शकते, कारण आपण सर्व काही पुन्हा सुरु करत आहोत. मात्र आपण कोरोना पोहचू शकतो अशा ठिकाणी आधीच पोहचत आहोत. या परिस्थितीत आपलं सरकार आणि वैद्यकीय विभाग सक्षम आहे असेही उद्धव ठाकरे यांनी म्हंटले आहे. याशिवाय येत्या काळात महाराष्ट्रात पाऊस वाढेल. यावेळी आजारांना आयते निमंत्रण असते मात्र आपण काळजी घेणे आवश्यक आहे असेही ठाकरे यांनी म्हंटले आहे.