राज्याच्या पर्यावरण विभागाला आता 'Environment And Climate Change Department' असे संबोधले जाणार, महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा निर्णय
Shiv Sena leader Aaditya Thackeray (Photo Credits: IANS/File)

महाराष्ट्र मंत्रिमंडळाने (Maharashtra Cabinet) राज्याच्या पर्यावरण विभागाचे नाव आता बदलण्यात आले आहे. त्यानुसार आता पर्यावरण विभागाला आता 'पर्यावरण व वातावरणीय बदल' असे नाव ठेवण्यात आले आहे. 'पर्यावरण व वातावरणीय बदल' (Environment and Climate Change Department) या विभागाकडून आता निसर्गाशी निगडीत असलेल्या महत्वाच्या पाच तत्वांवर काम करणार आहेत. पृर्थ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश ही यामधील पंचतत्व असणार आहे. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या पर्यावरण दिनाच्या वेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री संजन बनसोडे यांनी नाव बदलण्याबाबत घोषणा केली होती.(#Unlock1 In Maharashtra: मुंबईत दोन महिन्यानंतर जुहू बीचसह मरिन ड्राईव्ह येथे दिसली नागरिकांची पुन्हा वर्दळ, पहा फोटो) 

राज्य शासनाची निसर्गाची असलेली कटिबद्धता निश्चित करण्यासाठी यंदाच्या वर्षात विभागाकडून 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे म्हटले होते. तसेच यंदाच्या वर्षात पर्यावरण दिन 2020 साठी "Time For Nature" ही थीम ठेवण्यात आली होती. याच आधारावर सरकारने दुसऱ्या विभागांसह हवामान बदलांशी संबंधित उपाय योजना करत निसर्ग पुरक जीवन पद्धतीसाठी कृती आराखडे तयार केले आहेत.(मुंबई: 'दादर' च्या शिवाजी पार्क मध्ये रस्ते रंगवून दिले COVID-19 विषयी जनजागृती निर्माण करण्याचे धडे See Photos)

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी असे म्हटले होते की, विभागाचे नाव बदण्यासह त्याचे लक्ष्य आणि उद्देश्य अधिक व्यापक असणार आहेत. तसेच पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग आता पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पाच सिद्धांतांवर काम करणार आहे. यामध्ये पृथ्वी विभाच्या अंतर्गत मवनीकरण, वनसंवर्घन सारख्या अन्य गोष्टींबाबत काम करण्यात येणार आहे.