Marine Drive After Unlock 1 (Photo Credits: Instagram)

देशभरासह महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना व्हायसरचा (Coronavirus) प्रादुर्भाव वेगाने वाढत चालला आहे. त्यासाठीच येत्या 30 जून पर्यंत लॉकडाऊनचा (Lockdown)  निर्णय सरकारकडून जाहीर करण्यात आला आहे. परंतु महाराष्ट्रात Unlock च्या विविध टप्प्यांनुसार लॉकडाऊन 5.0 मध्ये नियम शिथील करत काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र नागरिकांना त्यावेळी नियमांचे पालन करणे सुद्धा अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याच दरम्यान आता Unlock 1 नुसार नागरिकांना आता सकाळच्या वेळेस मॉर्निंग वॉकला (Morning Walk) जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. Mission Begin Again: BEST बस सेवा उद्या पासून होणार सुरु; अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह इतरांना 'हे' नियम पाळुन प्रवासास मुभा

मुंबईतील जुहू बीच (Juhu Beach) येथे नागरिक सकाळच्या वेळेस फेरफटका मारण्यासह जॉगिंला आल्याचे दिसून आले. जुहू येथे राहणारा स्थानिक दिपक याने असे म्हटले आहे की, लोक घराबाहेर पडून आनंद व्यक्त करत आहेत. मात्र त्यावेळी कोरोनासंबंधित सर्व नियम आणि काळजीचे पालन सुद्धा नागरिकांकडून करण्यात येत असल्याचे त्याने सांगितले आहे.

तसेच मरिन ड्राईव्ह येथे सुद्धा नागरिकांची वर्दळ पहायला मिळाली. मात्र त्यावेळी नागरिकांनी मास्क घालत मरिन ड्राईव्ह येथे समुद्राच्या लाटांसह तेथील वातावरणाचा आनंद घेताना दिसून आले. त्याचसोबत तेथे स्वत:सह दुसऱ्याची सुद्धा काळजी घ्या असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, मुंबईत शनिवारी 1 हजार 274 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून 57 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांचा मुंबईतील आकडा 47 हजार 128 वर पोहचला आहे. त्यापैकी 1 हजार 575 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 19,978 जणांना कोरोनावर मात केली आहे. तर राज्य सरकारसह कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि सफाई कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत.