BEST Bus| File Image | (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्र सरकारच्या (Maharashtra Government)  निर्णयानुसार उद्या म्हणजेच 8  जून पासून (बेस्ट) बसेस सर्वांसाठी सेवा पुन्हा सुरू करणार आहेत. तथापि, बेस्टच्या बसमध्ये प्रवास पूर्वीसारखी होणार नाही. कोरोना व्हायरसचे संकट लक्षात घेता यापुढे काही प्रत्येक बस मध्ये 60 % क्षमतेत प्रवासी स्वीकारले जातील. या प्रवाशांना सुद्धा सोशल डिस्टंंसिंंगच्या (Social Distancing)  नियमांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे. नव्या नियमावली नुसार बसमध्ये प्रति सीट फक्त एक प्रवासी आणि पाच स्टँडिंगला परवानगी देण्यात येणार आहे. तीस प्रवाशांना बसण्यास आणि प्रवास करण्यास परवानगी देण्यात येणार आहे आणि पाच जणांना आता बसमध्ये उभे राहण्याची मुभा देण्यात आली आहे, म्हणजेच एकावेळी जास्तीत जास्त 35 लोक प्रवास करू शकतील.  Coronavirus In Maharashtra: तुमच्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण? पहा महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी

प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्र सरकारच्या ‘मिशन बिगिन अगेन’ च्या तिसर्‍या टप्प्यासह खासगी क्षेत्रात काम करणारे लोक, दुकानदार, इलेक्ट्रीशियन, प्लंबर आवश्यक सेवा कर्मचारी, सरकारी कार्यालयांमध्ये कर्मचारी, आणि दुकानदार आदी लोकांना बेस्ट बस वापरता येतील.Unlock 1 अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील लॉकडाऊनचे अनेक निर्बंध शिथील; दुकानं, जीम, खाजगी कार्यालयं आणि शैक्षणिक संस्था यांसदर्भात नवी नियमावली जारी

मार्च मध्ये देशव्यापी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर बेस्टने बससेवा बंद केली होती. फक्त शासकीय आणि महानगरपालिका कार्यालयांमध्ये काम करणार्‍या आणि रुग्णालयातील कर्मचार्‍यांसह केवळ आवश्यक कामगारांसाठी सेवा सुरू ठेवण्यात आल्या होत्या, मात्र आता मिशन बिगिन अगेन अंतर्गत बससेवा पुन्हा सुरु केल्या जाणार आहेत. लॉकडाउन मुळे अगोदरच मुंंबईची लाईफ लाईन लोकल ट्रेन सेवा बंद आहे अशावेळी आता मुंबईकरांना तारणहार म्हणुन बसचा वापर होणार आहे.