Maharashtra Budget Session 2020: महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज (6 मार्च) विधिमंडळामध्ये सादर केला जाणार आहे. या पहिल्या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी, गृहिणी, तरूण मंडळींना काय मिळणार याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान विधानसभेमध्ये आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) सकाळी 11 वाजता अर्थ संकल्पाचे वाचन करण्यास सुरूवात करणार आहेत. दरम्यान या अर्थसंकल्पापूर्वी काल (5 मार्च) महाराष्ट्र राज्याचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात आला आहे. विधानसभेमध्ये अर्थमंत्री अजित पवार तर विधान परिषदेमध्ये अर्थ राज्यमंत्री शंभूराज देसाई अर्थसंकल्पाचे वाचन करणार आहेत. दरम्यान आजचा शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे महाविकास आघाडी सरकार 100 दिवसांचा टप्पा देखील पूर्ण करत आहेत. त्यामुळे यंदाच्या राज्याच्या अर्थसंकल्पाकडे लक्ष लावून बसलेल्या सामान्यांना घरबसल्या महाराष्ट्र राज्याच्या 2020-21 या अर्थसंकल्पाचे लाईव्ह प्रक्षेपण दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून पाहता येणार आहे. तसेच युट्युब लिंकवरही त्याचे प्रक्षेपण पाहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरडोई उत्पन्नात घसरण झाल्याने महाराष्ट्र पाचव्या स्थानावर, आर्थिक सर्वेक्षणातून उघड.
महाराष्ट्र अर्थसंकल्प 2020-21 कुठे पहाल ?
अर्थमंत्री @AjitPawarSpeaks शुक्रवारी, दि. ६ मार्चला विधानसभेत सादर करणार अर्थसंकल्प. त्याचे थेट प्रक्षेपण मोबाईल, टॅब, लॅपटॉप, कॉम्प्युटरवर पाहता येणार. यासाठी महासंचालनालयाचे फेसबुक पेज https://t.co/otcHIYQ4H3 अथवा https://t.co/k8ihwiQrby या लिंकला उद्या सकाळी ११ वाजता भेट द्या pic.twitter.com/juskDYvytt
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) March 5, 2020
Maharashtra Budget 2020-21 Live Updates इथे वाचा.
महाविकास आघाडीने काही दिवसांपूर्वीच राज्यातील शेतकर्यांसाठी महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत 2 लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले आहे. तर त्याच्या दोन याद्या देखील जाहीर करण्यात आल्या आहेत. आता महाराष्ट्र राज्यातील सामान्यांना यंदाच्या अर्थसंकल्पातून काय मिळणार? याबाबत उत्सुकता वाढली आहे.