
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यंदा दहावी, बारावीच्या परीक्षा 10-15 दिवस आधीच घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता बोर्डाच्या विद्यार्थ्यांमध्ये निकालाची धाकधूक वाढली आहे. यंदा 10वी आणि 12वी च्या विद्यार्थ्यांचा निकाल 15 मे पर्यंत लावण्याचा शिक्षण मंडळाचा मानस आहे. उत्तरपत्रिका तपासण्याचं काम पूर्ण झालं असून आता निकाल लावण्याचं अंतिम टप्प्यातील काम सुरू आहे. त्यामुळे येत्या काही आठवड्यातच निकाल जाहीर केले जाऊ शकतात. त्यामुळे बोर्ड परीक्षा निकालाची उत्सुकता विद्यार्थ्यांसोबत पालक आणि शिक्षकांमध्येही वाढली आहे.
2024 चा बारावीचा निकाल 21 मे तर दहावीचा निकाल 27 मे दिवशी घोषित करण्यात आला होता. त्यामुळे यंदा दहावी, बारावीचे निकाल मे महिन्याच्या पहिल्या-दुसर्या आठवड्यातच लागल्याचा अंदाज आहे. सामान्यपणे बोर्डाकडून निकालाची तारीख केवळ एक दिवस आधीच जाहीर केली जाते आणि निकाल ऑनलाईन आधी जाहीर केला जातो. निकालाची प्रत आठवडाभरानंतर शाळा, कॉलेज मध्ये उपलब्ध केली जाते. तसेच बोर्डाकडून आधी बारावी आणि नंतर दहावीचा निकाल जाहीर केला जातो. यंदाही त्याच धर्ती आठवडाभराच्या फरकाने बारावीचा आणि दहावीचा निकाल जाहीर केला जाईल. Maharashtra HSC Pass Percentage: महाराष्ट्र बोर्ड बारावी परीक्षा पाच वर्षांतील उत्तीर्णांची टक्केवरी, 2025 चा निकाल कधी? घ्या जाणून .
कसा पहाल बारावीचा निकाल ऑनलाईन?
बारावीचा निकाल ऑनलाईन पाहण्यासाठी बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. तसेच ऑफलाईन डिजी लॉकर आणि एसएमएस च्या माध्यमातून निकाल पाहता येतील.
- mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- होमपेज वर निकालाची लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.
- आवश्यक माहिती ज्यात रोल नंबर, आईचं नाव याचा समावेश असेल ते भरा.
- सबमीट केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल.
- निकालाची प्रत तुम्ही डाऊनलोड करुन प्रिंट देखील करू शकता.
बारावीच्या निकालामध्ये उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हांला प्रत्येक विषयामध्ये किमान 35% गुण आवश्यक आहेत. जर तुम्ही निकालावर नाखूष असाल तर तर रिव्हॅल्युएशन, रिचेकिंग चा पर्याय स्वीकारू शकता. सोबतच पुन्हा पुरवणी परीक्षेला बसूनही तुमचं शैक्षणिक वर्षाचं नुकसान टाळू शकता.