Maharashtra Board SSC Result 2020: 10 वी चा निकाल आज दुपारी 1 वाजता; mahresult.nic.in वर पहा मार्क्स!
MSBSHSE 10th Result 2020 | File Image

Maharashtra Board 10th Result Date and Time:  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा 10 वी चा निकाल आज जाहीर केला जाणार आहे. दरम्यान कोरोना संकटामुळे बोर्डाला यंदाचे निकाल जाहीर करण्यास उशिर झाला आहे. मात्र आता अपेक्षेप्रमाणे जुलै महिन्याच्या शेवटापर्यंत निकाल जाहीर केला जात आहे. विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजता mahresult.nic.in या संकेतस्थळावर त्यांचा निकाल पाहता येईल तसेच इतर थर्ड पार्टी वेबसाईट्सवर देखील ऑनलाईन गुण पाहण्याची सोय करण्यात आली आहे. आज ऑनलाईन निकाल पाहिल्यानंतर येत्या काही दिवसांत विद्यार्थ्यांना शाळेत निकालाची प्रत पाहता येणार आहे.

महाराष्ट्रामध्ये यंदा 10वीची परीक्षा 3 मार्च ते 23 मार्च अशी नियोजित होती. मात्र कोरोना संकटामध्ये भूगोलाचा पेपर रद्द करून त्याचे सरासरी गुण विद्यार्थ्यांना दिले जाणार आहेत. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांमध्ये निकालाबाबत प्रचंड उत्सुकता पहायला मिळत आहे. आता येत्या काही तासांतच विद्यार्थ्यांच्या निकालाची प्रतिक्षा संपणार आहे. Maharashtra Board Exam Results 2020: 10वी 12वी च्या निकालामध्ये यंदा नव्या गुणदान पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी किमान किती टक्के गुण हवेत?

महाराष्ट्र बोर्ड 10 वी चा निकाल पाहण्यासाठी वेबसाईट्स?

mahresults.nic.in

maharashtraeducation.com

results.mkcl.org

mahahsscboard.maharashtra.gov.in

10 वी चा निकाल कसा पहाल?

  • mahresults.nic.in / अन्य अधिकृत वेबसाईटवर क्लिक करा.
  • त्यानंतर Maharashtra SSC Result 2020 रिझल्ट यावर क्लिक करा.
  • रोल नंबर, नाव आणि आईचं नाव टाकून सबमीट करा
  • Maharashtra MSBSHSE SSC 10th Result 2020 तुम्हांला स्क्रिन वर दिसू शकेल.

    तुम्ही निकालाची प्रिंट काढू शकता.

महाराष्ट्रात 9 विभागीय मंडळांमध्ये 10वीची परीक्षा होते. त्यानुसार यंदा दहावीच्या परीक्षेला 17 लाखापेक्षा अधिक विद्यार्थी बसले होते. आज त्यांचा निकाल जाहीर केला जाईल.