राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावी परीक्षेचाी निकाल आज (2 जून) जाहीर झाला. हा निकाल आज दुपारीच 1 वाजता राज्य शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाइट - mahresult.nic.in वर जाहीर केला जाईल. तसेच हा निकाल mahahsscboard.in वर पाहता येणार आहे. दरम्यान, राज्याचा एकूण निकाल 93.83% लागला आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा निकालाची टक्केवारी घसरल्याचे आकडेवारीवरुन पुढे येते. दरम्यान, 98.11 टक्क्यांसह कोकण विभागाने बाजी मारली आहे.
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले की, राज्याच्या लागलेल्या एकूण 93.83 टक्के निकालामध्ये मुली आघाडीवर आहेत. या परीक्षेत 95.87 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर त्या तुलने मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 92.05 टक्के इतके आहे. कोकण विभाग सर्वात अव्वल तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.महाराष्ट्र शिक्षण मंडळाने पत्रकार परिषद घेत विभागनिहाय निकाल टक्केवारीत जाहीर केला. (हेही वाचा, Maharashtra Board 10th SSC Result 2023: इयत्ता 10वी बोर्ड परीक्षा निकाल आज, mahahsscboard.in आणि mahresult.nic.in वर आसन क्रमांक आणि नावावरुन ऑनलाइन पाहा, डाऊनलोड करा रिजल्ट)
इयत्ता दहावीचा विभागवार निकाल (टक्केवारीत)
- कोकण : 98.11 टक्के
- कोल्हापूर: 96.73 टक्के
- पुणे : 95.64 टक्के
- मुंबई : 93.66 टक्के
- औरंगाबाद : 93.23 टक्के
- अमरावती : 93.22 टक्के
- लातूर : 92.67 टक्के
- नाशिक : 92.22 टक्के
- नागपूर : 92.05 टक्के
महाराष्ट्र शिक्षण मंडळाने पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, यंदा 15,79, 374 विद्यार्थी इयत्ता दहावी परिक्षेला बसले होते. हे विद्यार्थी राज्यभरातील 23 हजार 10 शाळांतून आले होते. पाच वर्षांच्या तुलनेत पहिल्यांदाच इयत्ता दहाविला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तुलनेत कमी पाहायला मिळाली. पाठिमागच्या वर्षाच्या तुनलेत यंदा परिक्षार्थी विद्यार्थ्यांच्या संख्येत 61,708 इतकी घट झाली.
दरम्यान, महाराष्ट्र एसएससी 2023 चा निकाल अधिकृत वेबसाइट - mahresult.nic.in वर जाहीर केला जाईल. तसेच हा निकाल mahahsscboard.in वर देखील उपलब्ध असेल. विद्यार्थी या वेबसाइटवर त्यांचा निकाल रोल नंबर आणि नावानुसार ऑनलाइन माध्यमातून पाहू शकतात तसेच डाउनलोड करू शकतात.