नागपूरात दरवर्षी महाराष्ट्र विधिमंडळाचे (Maharashtra Assembly Winter Session) नागपूरामध्ये (Nagpur) अधिवेशन होते. त्यानुसार उद्यापर्यंत सुरू राहणार्या या अधिवेशनामध्ये नेमकं राज्याच्या उपराजधानीसाठी काय मिळणार? याकडे सार्यांचे लक्ष लागले होते. दरम्यान आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विदर्भासाठी (Vidarbha) काही घोषणा केल्या आहेत. त्यामध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 15 हजारांचा बोनस जाहीर करत शेतकर्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. याचा फायदा 5 लाखांपेक्षा अधिक शेतकर्यांना होणार असून थेट अकाऊंटमध्ये ही रक्कम दिली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली आहे.
विदर्भसाठी महत्त्वाच्या घोषणा
राजमाता जिजाऊंचं जन्मस्थळ असलेल्या सिंदखेडराजा आणि लोणार तलावाच्या आराखड्यानुसार काम सुरू आहे. लोणार सरोवराचं पर्यटनाच्या दृष्टीने विकास व्हावा म्हणून 369 कोटी 78 लाखांच्या विकास आराखड्याला मंजुरी
गग्डचिरोलूमध्ये खनिक उत्खनन प्रकल्प सुरू केला जाणार आहे. 70 हजार कोटीच्या रुपयांच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता दिली असून त्यापैकी विदर्भामध्ये एकूण 44 हजार 123 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याने 45 हजार रोजगार निर्मितीचं उद्दिष्टं आहे.
अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना 222 कोटी 32 लाख रूपये जाहीर करण्यात आले आहेत.
नागपूर मेट्रो रेल प्रोजेक्ट फेज 1 साठी 9279 कोटीच्या सुधारित खर्चाला मान्यता मिळाली आहे. तसेच वडसा देसाईगंज ते गडचिरोली या नव्या रेल मार्गासाठी 1 हजार 96 कोटीची मान्यता करण्यात आली आहे.
विदर्भ मजबूत, तर राज्य मजबूत, अशी आमची भावना आहे. विदर्भाच्या संपूर्ण विकासाशिवाय महाराष्ट्राचा विकास पूर्ण होऊ शकत नाही. देशासाठी महाराष्ट्र जसा महत्त्वाचा तसा महाराष्ट्रासाठी विदर्भ महत्त्वाचा आहे- मुख्यमंत्री @mieknathshinde यांचे विधानसभेतील २९३ च्या प्रस्तावाला उत्तर pic.twitter.com/6UOpQxCCG6
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) December 29, 2022
काही दिवसांपूर्वीच मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचा एक टप्पा लोकांसाठी खुला करण्यात आला आहे. आता त्यामध्ये टप्प्या टप्प्याने काही गोष्टी वाढवूनरोजगार, पर्यटनाच्या संधी वाढवल्या जाणार आहेत.