भाजप मुंबई कार्यालय (Photo Credit: ANI)

महाराष्ट्र (Maharashtra) विधानसभा निवडणुकीचे निकाल आता काही वेळांनी जाहीर केले जाईल. 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरु होईल. दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक दिग्गज नेते निवडणुकीच्या रींगणात उतरले आणि आता त्यांचे भाग्याचा निकाल थोड्याच वेळात लागेल. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अनेक स्तरावर विजयाचे अंदाज बांधले जात आहे. अनेक एक्सिट पोल समोर आले. यात भाजप-शिवसेना याच्या युतीला मोठा विजय मिळवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे, आता सर्वांना निवडणूक निकालाची उत्सुकता लागून राहिली आहे. भाजप (BJP) आपली सत्ता टिकवून ठेवणार की राष्ट्रवादी (NCP)-काँग्रेसची (Congress) युती सत्ता पालट करणार हे पाहणे यंदा उत्सुकतेचे असेल. पण, निवडणुकीआधीच भाजपने दिवाळी साजरी करणे सुरु केला आहे. भाजपच्या दिग्गज नेत्यांनी यंदा महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्याबाबत विश्वास दर्शवला आहे. आणि यासाठी भाजपा प्रदेश कार्यालयही तयार आहे. (Maharashtra Election Results 2019: मतमोजणी प्रक्रिया सुरु झाल्यानंतर पहिल्या फेरीचा निकाल तासाभरात येण्याची शक्यता, इथे पाहता येणार निकाल)

अवघे काही तासांवर आलेल्या निकालासाठी भाजपाने त्यांच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयाला दिवाळीसारखे सजवले आहे. इतकेच नाही तर, पक्षाने यापूर्वी 5000 लाडूंचे ऑर्डर दिले आहेत. आणि कार्यालय फुलांनी सजवले आहे.

आकाश कंदीलने सजले मुंबई कार्यालय

लाडूही आहे तयार

इंडिया टुडे-अ‍ॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये भाजप-शिवसेनेने बहुमतापेक्षा जास्त जागा मिळवण्याचा अंदाज बांधला आहे. एक्झिट पोलनुसार, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात 47 वर्षांपासून सुरू असलेली परंपरा मोडून नवीन इतिहास घडवणार आहेत. 1967 नंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील ही पहिलीच वेळ असेल जेव्हा पाच वर्षांच्या राजवटीनंतर मुख्यमंत्री सलग दुसऱ्यांदा बहुमताने सत्तेत पुनरागमन करेल. एक्झिट पोलमध्ये भाजपा आघाडीला 166-194 जागा, कॉंग्रेस-राष्ट्रवादीला 72-90 आणि अन्य पक्षांना 22-34 जागा मिळतील.