महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी बहुजन पार्टी कडून श्रीपाद छिंदम यांना उमेदवारी जाहीर
श्रीपाद छिंदम (Photo Credits-Facebook)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी नगरचे माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम (Shripad Chindam) यांनी वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून (Vanchit Bahujan Aaghadi) उमेदवारी देण्यात आली आहे. तर अहमनगर (Ahmednagar) विधानसभा मतदारसंघातून छिंदम यंदा निवडणूक लढवणार आहेत. तर पक्षाकडून एबी फॉर्म मिळाल्यानंतर आज (4 ऑक्टोंबर) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधाने केल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. त्यानंतर छिंदम यांना त्यांच्या या विधानांनमुळे उपमहापौर पद सोडावे लागले होते. पण महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत छिंदम यांनी अपेक्ष उमेदवारी जाहीर केली होती. त्यात शिवसेना, भाजपचा उमेदवारांचा पराभव करत छिंदम यांना विजय मिळाला होता. तर आता यंदाच्या विधानसभा निवडणूकीसाठी आज श्रीपाद छिंदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून नगर मधून त्यांना तिकिट देण्यात आले आहे.(Maharashtra Assembly Elections 2019: वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर)

गुरुवारी रात्री उशिरा बहुजन पक्षाकडून छिंदम यांना एबी फॉर्म दिल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली होती. तर आज सकाळी 11 वाजता छिंदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर छिंदम यांच्या उमेदवारीमुळे अनिल राठोड किंवा संग्राम जगताप यापैकी कोणाला त्रासदायक ठरणार यावर आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

तर काही दिवसांपूर्वी र वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून विधानसभा निवडणूकीसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाकडून 22 उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली आहे. मात्र उमेदवारांचा नावांपुढे जातीसुद्धा उल्लेख करण्यात आला आहे.