Maharashtra Assembly Elections 2019: विधानसभा निवडणूकीसाठी नितेश राणे यांना भाजप कणकवली मधून उमेदवारी देणार?
नितेश राणे (Photo credit : youtube)

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या मुलगा नितेश राणे (Nitesh Rane) विधानसभा निवडणूक (Assembly Election) लढवणार असल्याने जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत.मात्र यंदाची विधानसभा निवडणूक भाजप (BJP) पक्षाकडून नितेश राणे लढवतील असे बोलण्यात येत असून त्यांना कणकवली (Kankavali) येथून उमेदवारी देण्यात येणार असल्याचे नारायण राणे यांच्याकडून सांगण्यात येत आहे.  एका वृत्तवाहिनीसोबत बातचीत करताना नारायण राणे यांनी असे म्हटले आहे की, भाजप पक्षाकडून जाहीर करण्यात येणाऱ्या उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत नितेश राणे यांचे नाव असणार आहे. नितेश राणे यांनी 2014 मध्ये विधानसभा निवडणूकीवेळी काँग्रेसकडून त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथून उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी नितेश राणे यांनी भाजप आमदार प्रमोद जठार यांना हरवत विजय मिळवला होता.

तसेच नारायण राणे यांनी असे म्हटले की, महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाला भाजपात विलन करण्याबाबत येत्या आठवड्याभरात कळणार आहे. नारायण राणे यापूर्वी शिवसेना पक्षात होते त्यानंतर 2005 मध्ये त्यांनी पक्ष सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. पण 2017 पर्यंत काँग्रेस पक्षात राहून काम केले. मात्र काही काळानंतर त्यांनी स्वत:चा पक्ष स्थानपन करत भाजपसोबत मित्रपक्ष म्हणून काम करण्यास सुरुवात केली. सध्या नारायण राणे भाजपकडून राज्यसभेचे सदस्य आहेत.(नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला)

काही महिन्यांपूर्वी नितेश राणे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला होता. त्यामध्ये नितेश राणे यांनी कणकवलीत मुंबई-गोवा राजमार्गावरील खड्ड्यांवरुन उपअभियंता याला पुलाला बांधून त्याच्यावर चिखल फेकताना दिसून आले होते. या प्रकरणी वाद वाढल्याने नितेश राणे यांनी स्वत:हून कणकवली पोलिसात जाऊन गुन्हा कबूल केला होता. तसेच नारायण राणे यांनी नितेश राणे यांच्या वागण्यावर माफी सुद्धा मागितली होती.

मात्र दुसऱ्या बाजूला भाजप पक्षाने मंगळवारी विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये 125 उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या उमेदवारीच्या यादीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांचे नाव सामील आहे. पण हायवोल्टेज प्रोफाइल एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांचे यादीतून नाव वगळण्यात आले आहे. त्यामुळे आता भाजपच्या दुसऱ्या यादीतून ही  एकनाथ खडसे यांना वगळण्यात आले असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे.  खडसे यांच्या जागी त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांना उमेदवारी मिळली असल्याचे ही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.