महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालात नवाब मलिक, झीशान सिद्दीकी यांच्यासह 'या' मुस्लिम उमेदवारांनी मारली बाजी; पहा मतांची आकडेवारी
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 (Photo Credits-File Image)

महाराष्ट्र्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhansabha Elections 2019)  निकालाला आज, 24 ऑक्टोबर रोजी सकाळपासून सुरुवात झाली असून अनेक ठिकाणचे निकाल समोर आले आहेत. मताधिक्याच्या या स्पर्धेत सध्या तरी भाजपा- शिवसेना युती ही 150 हुन अधिक जागांवर आघाडी घेताना दिसत आहे. याशिवाय काँग्रेस, राष्ट्रवादी हे मुख्य पक्ष सोडल्यास इतर मध्ये येणाऱ्या AIMIM पक्षाने देखील चांगली गती साधली आहे. राज्यातील 288 मतदारसंघापैकी हाती आलेल्या निकालात तब्बल 10 ठिकाणी मुस्लिम धर्मिय (Muslim Candidate) उमेदवारांनी आघाडी घेतली असून काही ठिकाणी तर विजयही मिळवला आहे. यामध्ये अणुशक्ती नगर (Anushakti Nagar) येथून नवाब मलिक (Nawab Malik), वांद्रे पूर्व (Vandre East) मतदारसंघातून झीशान सिद्दीकी (Zeeshan Baba Siddique), सिल्लोड (Sillod) मतदारसंघातून अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांचा विजयी उमेदवारांच्या यादीत समावेश आहे. तर भिवंडी (Bhiwandi), मानखुर्द (Mankhurd), मालेगाव मध्य (Malegaon Central) येथून देखील मुस्लिम उमेदवार मतांमध्ये पुढे आहेत. या उमेदवारांच्या आणि मतांच्या आकडेवारीचा एक आढावा जाणून घेऊयात..

विजयी उमेदवार

अणुशक्तीनगर, राष्ट्रवादी काँग्रेस, नवाब मलिक : 65068 मते ,

सिल्लोड शिवसेना, अब्दुल सत्तार :118867 मते

वांद्रे पूर्व, झीशान सिद्दीकी, काँग्रेस, 38309 मते

आघाडीवरील उमेदवार

औरंगाबाद मध्य, AIMIM, नसरुद्दीन सिद्दीकी: 67121 मते

चांदिवली, काँग्रेस, नसीम खान: 85436 मते

भिवंडी पूर्व , समाजवादी पक्ष, रईझ शेख: 45154 मते

मालेगाव मध्य, AIMIM, मुफ्ती मोहम्मद इस्माईल: 116906 मते

मुंबादेवी, काँग्रेस, अमीन पटेल: 58209 मते

मानखुर्द समाजवादी पक्ष, अबू असीम आझमी: 69036 मते

मालाड पश्चिम, काँग्रेस, अस्लम शेख: 64249 मते

दरम्यान, यंदा विधानसभा निवडणुकीत भाजपाने आपण 220 पार करणार असल्याचा दावा केला होता मात्र सध्या समोर आलेले अनेक निकाल हे आश्चर्यकारक आहेत.तर शरद पवार यांच्या दमदार प्रचारामुळे यंदा विधानसभा निवडणुकीत निदान एक विरोधी पक्ष म्ह्णून समोर येऊ शकेल. इतर पक्षांमध्ये वंचित बहुजन आघाडी मात्र प्रचार करूनही केवळ 1  जागेवर समाधान मानायला लागले आहे.