Maharashtra Assembly Elections 2019: महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीने लाखो खोट्या मतदारांची नावे यादीत जोडली असल्याचा काँग्रेस पक्षाकडून आरोप
Congress Logo (Photo Credits: Wiki Commons)

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीचे (Assembly Elections) बिगुल वाजले आहे. त्यामुळे आता राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली असून येत्या 21 ऑक्टोंबरला विधानसभा निवडणूक होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच निवडणूकीच्या निकाल 24 ऑक्टोंबरला सांगण्यात येणार असल्याचे ही स्पष्ट करण्यात आले आहे. तर यंदा आचारसंहिताबाबत काही नियम सुद्धा अधिक शिथील करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस (Congress) पक्षाकडून खोट्या मतदारांबाबत मुद्दा उचलून धरण्यात आला आहे.

निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी राज्यात जवळजवळ 2.16 लाख खोटे मतदारांचे नाव मतदार यादीतून काढून टाकण्यात आली असल्याचे सांगितले आहे. मात्र राज्यात अद्याप खोटे मतदार असून त्यांची नावे यादी मध्ये शिवसेना-भाजप युतीने जोडले असल्याचा आरोप केला आहे. गेल्या वर्षात मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसढ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणूकी वेळी खोट्या मतदारांचा मुद्दा फार चर्चेत होता. यावरुन काँग्रेसने आक्रमकतेचा पवित्रा घेतला होता. भोपाल, जयपूर ते दिल्ली पर्यंत खोट्या मतदारांबाबत विविध पद्धतीने विधान केली गेली होती. मात्र आता महाराष्ट्रातील खोट्या मतदारांबाबत मुद्दा अधिक उचलून धरला आहे.(Maharashtra Assembly Election 2019: ईव्हीएम डोळ्यासमोर ठेवूनच मतदान आणि मत मोजणी यात 3 दिवसाचे अंतर? छगन भुजबळ यांच्याकडून शंका व्यक्त)

काँग्रेसने 44 लाख खोटे मतदार महाराष्ट्रत असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसकडून हा मुद्दा वारंवार उचलून धरला जात आहे. लोकसभा निवडणूकीवेळी सुद्धा हा मुद्दा उचलला गेला होता मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. तसेच काँग्रेस कडून यंदा विधानसभा निवडणूकीत एनडीचे सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.